Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Land Scam Parth Pawar: मुख्यमंत्री–महसूल मंत्र्यांकडून संरक्षण? पुणे जमीन गैरव्यवहारावर अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी असून त्यामध्ये मुंढव्याची जमीन नमूद आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2025 | 02:43 PM
Pune Land Scam Parth Pawar:

Pune Land Scam Parth Pawar:

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकामागून एक नवे खुलासे
  • अजित पवार यांनादेखील या व्यवहारांची माहिती
  • पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,
Pune Land Scam Parth Pawar:  राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकामागून एक नवे खुलासे समोर येत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सन 2021 मध्ये शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अॅटॉर्नी व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आता उजेडात आली आहेत. विशेष म्हणजे, या पॉवर ऑफ अॅटॉर्नी दस्तऐवजावर दोन्ही पक्षांच्या सह्या असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात पुन्हा खळबळजनक खुलासे केले आहेत.

विजय कुंभार म्हणाले की, यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते , त्यावेळी ते माझ्या सहीचे पत्र नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पण २५ मे २०२५ रोजी हा व्यवहार झाला होता. ही सर्व कागदपत्र सरकार दरबारी पडली आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. एकाच नोटरी वकिलाकडून ही कागदपत्रे बनवून घेतली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील या व्यवहारांची माहिती होती. इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडून या प्रकरणात प्रोटेक्ट केलं जात असल्याचा खळबळजनक दावा विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केला.

“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं

पुण्याील जमीन घोटाळा प्रकरणमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असा आरोपही कुंभार यांनी केला. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) यांनीदेखील पुन्हा काही धक्कादायक दावे केले आहेत, त्याचवेळी अजित पवार यांच्या आज राजीनामा घेतला नाही तर, असा इशाराही दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी असून त्यामध्ये मुंढव्याची जमीन नमूद आहे. या दस्तऐवजाच्या प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची सही असून त्यांचा फोटोही आहे. ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी सन 2021 मधील असून याच जमिनींसंदर्भात करण्यात आली आहे.अॅडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे सर्व कागदपत्रे पाठवली असून, दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनीही ही माहिती पुरवली आहे. या कागदपत्रांमध्ये चॅट्सचाही समावेश असून, संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांच्यातील तसेच अजित पवारांचे पीए आणि तृप्ता ठाकूर यांच्यातील चॅटिंगही असल्याचा दावा दमानिया यांनी केला. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी वाघमारे यांचा मोबाईल क्रमांकही या कागदपत्रांमध्ये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL

हे सर्व पुरावे पोलिसांसमोर सादर करण्यात आले असतानाही अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. जर आजच अजित पवार यांचा राजीनामा घेतला गेला नाही, तर उद्या पुण्यात जाऊन त्यांच्या नावाने तक्रार दाखल करू, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात हा व्यवहार झाला असून, या प्रकरणात तीन ओएसडी सहभागी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार हे काही संत नाहीत

अंजली दमानिया म्हणाल्या, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनाच अडकवलं जात आहे. पण पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही. त्यामुळे कदाचित तृप्ता ठाकूर यांनी हे आम्हाला पाठवलं असाव. तो पत्ता तृप्ता ठाकूर यांनीच कलेक्टरला पाठवला असवा. आम्ही जी याचिका दाखल करणार आहोत त्याला सर्वात पहिले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. पण अजित पवार हेदेखील काही संत नाहीत. अजित पवारांचे 3 अधिकारीदेखील यात सामील आहेत. राम चौबे, संतोष हिंगणे, विकास पाटील यां अधिकाऱ्यांशी केलेलं चॅटिंगदेखील आमच्याकडे असल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.

Web Title: Pune land scam parth pawar pune land scam claims of political protection rock maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • anjali damania
  • parth pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.