Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या’ व्हिडीओवरून राहुल गांधी आक्रमक

Bihar Minor Girl Harassment Video: बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक पथक घटनास्थळी जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 04:22 PM
Rahul Gandhi, Bihar News, Jamui, Women Safety, POCSO Act

Rahul Gandhi, Bihar News, Jamui, Women Safety, POCSO Act

Follow Us
Follow Us:
  • बिहारच्या जमुईमध्ये अल्पवयीन मुला-मुलीची छेडछाड व हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • राहुल गांधी यांचा केंद्र आणि बिहार सरकारवर तीव्र हल्लाबोल
  • पीडित मुलीने हात जोडून विनंती करूनही नराधमांनी केले अश्लील व अयोग्य वर्तन
Rahul Gandhi Slams Modi Govt : बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासमधून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला काही पुरुषांनी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचाही आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींन अटक केली असून हा प्रकार शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पण या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवरून केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली बिहार राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. “बिहारमधील जमुई येथील एक व्हिडिओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला रस्त्यात जबरदस्तीने अडवण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला, अपमान करण्यात आला आणि मुलीवर हल्ला करण्यात आला. मुलीने हात जोडून तिला सोडून देण्याची विनंती केली, परंतु गुंडांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिची छेड काढणे सुरूच ठेवले.”

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा

“या लोकांना इतके असभ्यपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला?”

“या लोकांना इतके असभ्यपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला, “ही संस्कृती नाही; ही पुरुषसत्ता आहे. मुलीच्या शरीरावर, तिच्या हालचालींवर आणि तिच्या आवडीनिवडींवर पुरुष नियंत्रित करू शकतात, ही मानसिकता दिसून येते. पण “अंधभक्त हा प्रकार सामान्य असल्याचे ठरवतात, त्यावेळी अशा मानसिकेतेचे लोक हाच कायदा असल्याचे समजू लागतात.

“मुली रस्त्यावर सुरक्षित का नाहीत?”

पण आता व्हिडिओमध्ये दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून गुन्हेगारांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत खटला चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी.अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. “जर ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली असेल, तर गुन्हेगार अजूनही तुरुंगात का नाहीत? असा सवाल उपस्थित करत, बिहारच्या रस्त्यावर सायंकाळी सात वाजताही मुली सुरक्षित का नाहीत, याचे उत्तर बिहार सरकारने द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाने दखल घेतली

बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक पथक घटनास्थळी जाईल. जमुईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर अध्यक्षांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अशा घटना असह्य असून कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, ती मुलगी हात जोडून त्यांना सोडून देण्याची विनवणी करत आहे. या घटनेदरम्यान काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Ration Card PHH vs AAY: Ration Cardवर PHH की AAY? तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचं, महिन्याला किती

३ आरोपींना अटक

या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी नवीन यांनी याला दुजोरा दिला. जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल म्हणाले की, त्यांच्या निदर्शनास एक व्हिडिओ आला, ज्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग होत होता. त्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यावरून ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडल्याचे समोर आले. दयाल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस जनजागृती मोहीमही सुरू करणार आहेत.

The video from Jamui, Bihar is deeply disturbing. Two Class 10 students were stopped on a road. Harassed. Humiliated. Molested. A young girl, hands folded, begged to be let go while goons groped her and dragged her away. Who gave these men the right to behave like this? This is… — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 21, 2026

Web Title: Rahul gandhi slams govt over jamui bihar minor girl harassment video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.