(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून राजकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरऔन पोस्ट करत याबाबत भाष्य केलं. यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कथित रेकॉर्डिंगचा उल्लेख ‘फ्रेंडशिप फाईल’ असा केला. भाजपचे काही पदाधिकारी, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि काही यूट्यूब प्रभावक यांच्यातील संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला.
राज ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.”
“मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा.”
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल. — Raj Thackeray (@RajThackeray) October 23, 2026
“मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.”
Ans: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या कथित ऑडिओ क्लिपचा उल्लेख ‘फ्रेंडशिप फाईल’ असा केला.
Ans: फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची घोषणा केली. त्यावर राज ठाकरे यांनी केवळ क्लिपची सत्यता तपासून थांबू नये, तर संभाषणातील आरोपांचीही चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली.






