Rohini Khadse hits back at Chitra Wagh over controversial statement in Legislative Council
मुंबई : राज्यामध्ये विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. औरंगजेब कबर, दिशा सालियान प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, बीड हत्या प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरुन विधीमंडळ गाजले आहे. दरम्यान, विधान परिषदेमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. यामध्ये चित्रा वाघ आक्रमक पद्धतीने बोलताना दिसल्या. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भाजप आमदार चित्रा वाघ या आक्रमक पद्धतीने बोलताना दिसत आहेत. त्यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते अशी टीका केली होती. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. रोहिणी खडसे यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर मराठी बिग बॉस आणि चित्रा वाघ यांची व्हिडिओ एकत्रितपणे टाकली आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!! चित्रविचित्र, अशी घणाघाती टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे. रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!#चित्रविचित्र #Maharashtra pic.twitter.com/QGYajJ7YXV
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2025
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विधान परिषदेमधील या खडाजंगीवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. विरोधातील अनेक नेत्यांनी सभागृहातील या भाषेवरुन लक्ष्य केले आहे. रोहिणी खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, हे राज्याचं सभागृह आहे. बिग बॉसचा सीझन नाही. जी काल वक्तव्य करण्यात आलं ती पाहून मला बिग बॉसचा सीझन आठवला. त्या कार्यक्रमात तुम्ही जितकी एकमेकांची उनी-धुणी काढाल तेवढाच बिग बॉस खूश होतो. तसंच वक्तव्य चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खूश करण्यासाठी केलं होतं का? असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केल्यानंतर चित्रा वाघ यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील’, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.