
Rohit Pawar reply to Balaraje Patil challenge after Ujjwala Thite application was rejected in anagar
अनगर नगरपंचायतच्या समोर राजन पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आणि जल्लोष केला. राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील यांनी जोरदार आनंद व्यक्त केला. मात्र हा आनंद व्यक्त करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट चॅलेंज दिले. यामध्ये बाळाराजे पाटील यांनी अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही…असे म्हटले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामुळे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनगरच्या निवडणुकीची चर्चा रंगली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आदरणीय राजन पाटील साहेब, आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही,” असे रोहित पवार यांनी लिहिले.
आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार राजन पाटील यांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट केली (फोटो – एक्स)
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले की, “ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..!” असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.