Saurav Das Oxford Event London: सौरव दास ऑक्सफर्डला जाण्यापासून का रोखले? केंद्र सरकारचे उच्च न्यायालयाला उत्तर

दोन-तीन दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखले. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पण विमानतळावरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे ते प्रवास करु शकले नाहीत.
Passport Discrepancy May Impact Saurav Das's Citizenship, Central Govt Informs Delhi High Court
सौरव दास ऑक्सफर्डला जाण्यापासून का रोखले? केंद्र सरकारचे उच्च न्यायालयाला उत्तरCJP Co-Convenor Saurav Das Stopped at Airport
Published on: 
Updated on: 
  • सीजेपी नेते सौरव दास यांना विमानतळावरच अडवले

  • सौरव दास यांच्या विरोधात 'लुक आऊट सर्क्युलर' (LOC) जारी

  • पासपोर्टमधील विसंगती असल्याने नागरिकत्वावर परिणाम होण्याची शक्यता

Saurav Das Oxford Event London: ऑक्सफर्डमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी युनायटेड किंगडमला जात असताना विमानतळावर थांबवण्यात आलेल्या सीजेपी सदस्य सौरव दास यांच्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. सौरव दास यांच्या विरोधात 'लुक आऊट सर्क्युलर' (LOC) जारी करण्यात आले आहे. त्यांच्या पासपोर्टमधील विसंगतीमुळे त्यांच्या नागरिकत्वावर संभाव्य परिणाम होऊ शकतो, असे कारण देण्यात आले आहे.

Passport Discrepancy May Impact Saurav Das's Citizenship, Central Govt Informs Delhi High Court
Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

सौरव दास यांची थेट उच्च न्यायालयात धाव

दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखले. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पण विमानतळावरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे ते प्रवास करु शकले नाहीत. परदेशात प्रवास करण्यास नकार दिल्याने सौरव दास यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.

सौरव दास यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांना या 'लुक आऊट सर्क्युलर'बद्दल माहिती देण्यात आली नव्हती. परदेश प्रवासाला परवानगी न देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितले आहे.

Passport Discrepancy May Impact Saurav Das's Citizenship, Central Govt Informs Delhi High Court
फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने काय सांगितले?

केंद्र सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती सादर केली. मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सह-संयोजक सौरभ दास यांच्या विरोधात लुक-आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले होते. त्यातूनच युनायटेड किंगडम (UK) ला जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विमानतळावर थांबवण्यात आले.

ही माहिती न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सादर करण्यात आली. परदेशात प्रवास करण्यापासून रोखणाऱ्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर मागण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने न्यायालयाला माहिती दिली की, मुंबई पोलिसांनी सौरव दास यांच्या विरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केले होते. विमानतळावर त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई याच सर्क्युलरच्या आधारे करण्यात आली. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) चेतन शर्मा म्हणाले की, सौरव दास यांच्या पासपोर्टमध्ये काही अनियमितता आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या भारतीय नागरिकत्वावर परिणाम होऊ शकतो.

सौरव दास ऑक्सफर्ड विद्यापीठात का जात होते?

सौरव दास ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते, जिथे ते 'कॉकरोच मूव्हमेंट' या विषयावर बोलणार होते. पण २३ नोव्हेंबरच्या रात्री लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर थांबवण्यात आले.

Passport Discrepancy May Impact Saurav Das's Citizenship, Central Govt Informs Delhi High Court
भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

सौरव दास यांना विमानतळावर अडवणूक

बुधवारी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे, 'कॉकरोच जनता पार्टी'चे सह-संयोजक सौरव दास यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये, त्यांच्या पासपोर्टमध्ये नोंदवलेल्या जन्मस्थानाशी संबंधित विसंगतींबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

Q

सौरव दास यांना युनायटेड किंगडमला जाण्यापासून विमानतळावर का थांबवण्यात आले?

A

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सह-संयोजक सौरव दास यांच्याविरोधात 'लुक आऊट सर्क्युलर' (LOC) जारी केल्यामुळे त्यांना विमानतळावर थांबवण्यात आले.

Q

केंद्र सरकारने सौरव दास यांच्या पासपोर्ट आणि नागरिकत्वाबाबत न्यायालयात काय सांगितले?

A

सौरव दास यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या तपशीलात विसंगती आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, या विसंगतीमुळे त्यांच्या भारतीय नागरिकत्वावरही संभाव्य परिणाम होऊ शकतो, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला कळवले आहे.

Q

या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने कोणते निर्देश दिले आहेत?

A

आपल्याला LOC बद्दल कोणतीही माहिती दिली गेली नव्हती या सौरव दास यांच्या याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे आणि पुढील सुनावणी ९ डिसेंबर २०२६ रोजी ठेवली आहे.