
Sharad Pawar advice to Congress regarding Thackeray brothers alliance maharashtra local body elections
Sharad Pawar : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडत आहे. यामुळे राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस पक्षाने मुंबई पालिका निवडणुकीमध्ये एकला चलो रे चा नारा दिला आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची होऊ घातलेली युती न पटल्यामुळे कॉंग्रेसने हा निर्णय घेतला आहे. मात्र यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच अनुभवी व्यक्ती म्हणून सल्ला दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील मराठी माणसांच्या मतांचे एकत्रीकरण करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये मनसे नेते राज ठाकरे यांची उपस्थिती वाढली आहे. मात्र यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एकदिवशीय चिंतन शिबिरानंतर मुंबई महापालिकेसाठी कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरुन शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता?, असं शरद पवार यांचं मत आहे.
मनपा निवडणुकीतील आघाडी अथवा ठाकरे बंधुतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेस शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार हे आता ठाकरे बंधूसोबत जाणार की काँग्रेसबरोबर जाणार हे अद्याप समोर आलेले नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले. दोन दशकानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा झाली. याचाच फायदा निवडणुकीमध्ये मतांच्या स्वरुपामध्ये करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यानंतर अनेकदा ठाकरे बंधू हे एकत्रित सोहळ्यांमध्ये किंवा घरगुती कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्याचे दिसून आले. यानंतर राज ठाकरे यांनी देखील मतचोरीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंसोबत वाढलेली जवळीक ही कॉंग्रेसच्या पचनी पडली नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा राज ठाकरे यांच्या सहभागाला पूर्ण पाठिंबा असला तरी कॉंग्रेस मात्र याला विरोध करत आहे. कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मनसेवर आगपाखड केली आहे.