Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 01:11 PM
NCP Merger News, Sharad Pawar vs Ajit Pawar Faction, Ajit Pawar Death,

NCP Merger News, Sharad Pawar vs Ajit Pawar Faction, Ajit Pawar Death,

Follow Us
Follow Us:
  • शशिकांत शिंदे आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांकडून राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
  • विलीनीकरणाचा विषय आता बंद झाला असून त्यांचे लक्ष पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
  • नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात झालेल्या लाचखोरीच्या आरोपांवर छगन भुजबळ यांनी झिरवाळ यांची पाठराखण केली आहे.
NCP Merger Updates: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाचावत चर्चा रंगू लागल्या. शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यासोबत विलिनीकरणावर सकारात्मक संवाद झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांना विरोधी प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही विलीनीकरण हा विषय आमच्यापुढे नाही, असे सांगत यावरील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, “दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत निर्णय झाला होता, असे अनेक जण बोलत आहेत. परंतु आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आमच्याकडून विलीनीकरणासाठी कोणतीही गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर चर्चा सुरू झाली आणि आम्ही फक्त सत्य, शपथपूर्वक मांडले. त्यानंतर या विषयावर आम्ही भाष्य केलेले नाही.

पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

पटेल, तटकरे यांच्यावर बोलणे टाळले

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, असे ते म्हणाले, विलिनीकरणानंतर एनडीएसोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, असा कोणताही निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होता. आता याबाबत अंदाज व्यक्त करणे योग्य नाही. पुढील भूमिका ठरवण्याचा अधिकार सुनेत्रा वहिनींचा (Sunetra Pawar) आहे, असे शिंदे म्हणाले.

नरहरी झिरवाळ यांची पाठराखण

छगन भुजबळांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात घडलेल्या लाचखोरीच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. पोलिस त्याची चौकशी करतील. गृह खाते, सीएम, डीसीएमपर्यंत काय खरे, काय खोटे ही गोष्ट जाईल. नरहरी झिरवाळ यांनी स्वतःच या प्रकरणात आपला हात असल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका चूक आहे. ऑफिस व मंत्रालयात अनेक लोक काम करतात. त्यामुळे कुणी काय केले त्याच्याशी काय संबंध आहे? या प्रकरणी पोलिस चौकशीमार्फत योग्य ती स्थिती स्पष्ट होईल. नरहरी झिरवाळ या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास गेले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यास गेले त्याची मला माहिती नाही. त्यांच्या विभागाचे काही काम असेल, असे ते म्हणाले.  (Maharashtra Politics)

IMD Weather Update: छात्र्या काढून ठेवा! देशातील ११ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; तर उत्तर भारतात पुन्हा थंडीचा जोर

आम्हाला घाई नाही

दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आजही करता येईल, महिन्याने करता येईल किंवा दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचे कारण काय? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना जे योग्य वाटतील, त्यांना बोलावून या मुद्यावर चर्चा करतील. शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही. परंतु आज ते ठरलेच होते, ते झालेच पाहिजे असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही.

 

Web Title: Ncp merger updates is the ncp merger talks over both parties hint at ending the talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.