Sharad Pawar group leader Jitendra Awhad write post on displeasure with Chhagan Bhujbal
मुंबई : राज्यामध्ये जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापन व मंत्रिमंडळ विस्तार अशा सर्वच गोष्टींसाठी महायुतीमध्ये विलंब झाला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गट व अजित पवार गट यांच्यामधील अनेक नेते नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांनी आपली नाराजी सर्वांसमोर उघड केली आहे. मी काय खेळलं आहे का? असा भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. यावरुन राष्ट्रवादी शरद गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये न घेतल्यामुळे थेट नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी महायुतीच्या नेत्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती केली. छगन भुजबळ यांच्या नाराजीवर शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार हे छगन भुजबळ यांना मोठा मान सन्मान देत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी लिहिले आहे की, “आज छगन भुजबळसाहेबांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळसाहेब आले, त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ! छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे.
आज छगन भुजबळसाहेबांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळसाहेब आले ; त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळसाहेबांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2024
पुढे आव्हाड यांनी लिहिले आहे की, “1985-90 च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळासाहेबांनंतर कुणीही केले नसेल. मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतेय की, आदरणीय शरद पवार साहेबांसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यांनी व्यक्त केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ यांचे नाराजीनाट्य सुरु
अजित पवारांच्या पक्षाने महायुतीच्या नवीन सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते नाराज आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “छगन भुजबळ यांना मंत्री का केलं गेलं नाही? हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र छगन भुजबळ आमच्याबरोबर असेपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बरोबरीनेच छगन भुजबळ यांचा मान ठेवण्यात आला आहे. त्यांची खुर्चीही शरद पवारांसोबत असायची. जबाबदारीचा विषय आला की भुजबळांचे नाव नेहमी पुढे असायचे. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची खूप ताकदीने साथ दिली हे मी विसरणार नाही,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते.