Shiv Sena Aditya Thackeray Press reaction on Dinanath Mangeshkar Hospital woman death case
मुंबई : संसदेचे यंदाचे अधिवेशन जोरदार चर्चेत आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित झाले आहे. देशभरामध्ये वक्फ बोर्ड सुधारण विधेयकाची चर्चा रंगली आहे. लोकसभेमध्ये मध्यरात्री हे विधेयक पारित झाले. यानंतर काल (दि.03) राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक सादर करण्यात आले होते. दीर्घ चर्चेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. वक्फ बोर्ड विधेयकाला राज्यसभेमध्ये बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. यामुळे राज्यसभेमध्ये देखील वक्फ बोर्ड विधेयक पारित झाले आहे. ठाकरे गटाकडून विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान करण्यात आले. मात्र शरद पवार उपस्थित न राहिल्यामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेमध्ये काल रात्री 2 नंतर व्कफ बोर्डाचे विधेयक पारित करण्यात आले. लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. वक्फ बोर्ड विधेयकाला राज्यसभेमध्ये बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. ठाकरे गटाने या विधेयकाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. सत्ताधारी पक्षाकडून मुस्लीम समाजाच्या जमिनीवर डोळा असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. अजित पवार यांच्या पक्षाने एनडीएचे मित्रपक्ष म्हणून मतदान केले. मात्र यावेळी राज्यसभेमध्ये शरद पवार उपस्थित नसल्यामुळे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे युवानेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. आदित्य ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारण विधेयकावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या नेत्यांनी भाषण केली की यामधून गरीब मुस्लिम लोकांना मदत होणार. मग हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही. बिल वाचलं तर हिंदूंना काय फायदा होणार हे भाजपने सांगावं,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं आमदाराच्या पीएमच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी देखील चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, “रुग्णालयात दाखल होण्यापू्र्वी 10 लाख रुपये मागितले आहेत. या प्रकरणामध्ये हॉस्पिटलवर काय कारवाई करणार यावर लक्ष देऊन आहोत आम्ही?” असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ओशिवरा मधल्या इंद्रदर्शन नगर येथे रस्त्याचे काम पूर्ण झालेलं असताना पुन्हा आता तो रस्ता खोडण्यात आलाय. तिकडे अदानीकडून इलेक्ट्रिसिटी पाईपलाईन टाकण्याच काम सुरु केलं आहे. तिकडच्या नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकाला सांगतोय सतत खोदू नका शहाजी राजे क्रीडा संकुल देखील रस्ता खोडलाय. पैसे आपले यात वाया जातात. अनेक लोक विषय मुंबईतील घेऊन येतात मला त्यावर जायचं नाही. गेल्या 5 वर्षात वरिळीतील प्रकल्प मार्गी आम्ही लावलेत. टॉवर बांधत आहोत. प्रलंबित स्कीम मार्गी आम्ही लावतो,” असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले आहे.