नितेश राणेंचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर (फोटो सौजन्य-X)
Nitesh Rane on Sanjay Raut in Marathi : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष पाकिस्तानला ‘हिंदू राष्ट्र’ बनवू इच्छित आहे. यासंदर्भात नितेश यांनी X वर पोस्ट करत त्यामध्ये त्यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ बनवू इच्छितात. यावर आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले असून, आम्हाला पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, असं ट्विवमध्ये म्हटलं आहे.
मंत्र्यांचे हे विधान शिवसेनेचे (यूबीटी) मुखपत्र ‘सामना’ मध्ये प्रकाशित झालेल्या राऊत यांच्या अलिकडच्या साप्ताहिक लेखाच्या संदर्भात असल्याचे मानले जातं आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपवर जातीय द्वेष पसरवण्याचा आणि भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ बनवण्याच्या दिशेने नेण्याचा आरोप केला होता. यापूर्वी राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. त्यांनी केरळला ‘मिनी पाकिस्तान’ असेही म्हटले.
गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर कायदेशीर नोटीस पाठवली होती. ही नोटीस शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे वकील असीम सरोदे यांनी पाठवली आहे. संविधानाच्या कलम १६४ (३) नुसार मंत्रीपदाची शपथ घेताना नितेश राणे त्यांचे संवैधानिक कर्तव्य बजावत नसल्याचे त्यात म्हटले आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री राणे यांनी १३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळात जिल्हा नियोजन निधी असो, पक्ष निधी असो किंवा कोणताही सरकारी निधी असो, तो फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच दिला जाईल, इतर कोणालाही नाही. राणे म्हणाले की, मी तुम्हाला आधीच सांगत आहे की ज्या गावांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) आणि महाविकास आघाडीचे सरपंच किंवा अधिकारी आहेत, त्यांना मी एक रुपयाही देणार नाही.