
Shiv Sena Shinde Group targets BJP for Nanded Sankalpana by ashok chavan
नांदेड : भाजपने तयार केलेल्या संकल्पनाम्यात बहुतांश कामे ही उत्तर मतदारसंघातील असून ती मीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून आणली आहेत, भाजपने माझी कामे तर चोरली आहेतच पण आमचे उमेदवारही पळविले आहेत, भाजपाचा संकल्पनामा म्हणजे केवळ ‘बनवाबनवी’ आहे, असा ‘शब्दबाण’ नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकार परिषद घेत सोडला आहे.
जाहीर सभेने भाजपचा प्रचार अधिकृतपणे सुरू होणार आहे. निवडणुकीचे रणशिंग स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फुंकणार आहेत. ही जाहीर सभा सोमवार, ५ जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाने प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार महेंद्र पिंपळे व प्रभाग दहा मधील उमेदवार वंदना जाधव यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असून यामागे नेमके कोणते ‘अर्थकारण’ किंवा दबावाचे राजकारण दडले आहे, सर्व जनतेस माहित आहे, आहे, हे हे दोन्ही उमेदवार स्वतःहून शिवसेनेकडे आले होते, आम्ही त्यांना बोलावले नव्हते. त्यांच्याऐवजी शिवसेनेने प्रभाग पाचमध्ये मिनाक्षी धनजकर यांना तर प्रभाग दहामध्ये दिपाली थोरवट यांना पुरस्कृत केले आहे.
हे देखील वाचा : परभणीत १९७ जणांची माघार, ४११ जण रिंगणात; परभणी महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
आ. कल्याणकरांचा आरोप
शिवसेना उत्तर मतदारसंघात ४० तर दक्षिण मतदारसंघात २९ जागा लढवित आहे, लोकांमध्ये मिसळणारे सक्षम उमेदवार उभे केले असून जनता आमच्या पाठीशी राहिल, असा विश्वास आहे, मी कोणावर टीका करण्यात वेळ वाया घालणार नसून कामांमधून विरोधकांना ‘उत्तर’ देणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, अर्पणा नेरलकर, ऋषिर्कश नेरलकर, मंगेश कदम, सुहास कल्याणकर, राजेश चव्हाण, मुकुंद जवळगावकर, बापूराव गजभारे आदींची उपस्थिती होती.
भाजपाचा संकल्पनामा : पुतळा उभारण्याचा संकल्प
मनपा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून भाजपाने ‘आम्ही जिंकणारच’ अशी टॅगलाईन असणारा ‘कलरफुल’ विकसित नांदेडचा संकल्पनामा गुरुवारी प्रकाशित केला असून या संकल्पनाम्यात ‘भविष्यातील संकल्प’ यामध्ये अनेक विकासकामांचा उल्लेख केला आहे, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, स्व. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, भारतरत्न राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अटलजींचे हे जन्मशताब्दी वर्ष असून जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांना या माध्यमातून कृतीयुक्त अभिवादन करण्याचा मानस भाजपाने या संकल्पनाम्यात केला आहे, ही बाब लक्षवेधी ठरली आहे.
हे देखील वाचा : मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
भाजपाने सर्वप्रथम संकल्पनामा प्रकाशित करून निवडणूक प्रचाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार अजित गोपछडे, अमरनाथ राजूरकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची टीम निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज झाली आहे. विकासाचा संकल्पनामा शहरवासियांसमोर घेवून जातानाच भाजपाने केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांमधून शहरविकास कशाप्रकारे झाला व होणार आहे, याची मांडणी सुबकरित्या केली आहे. या संकल्पनाम्याचे संपादन करण्याची जबाबदारी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यावर होती, त्यांनी खासदार चव्हाण यांच्या संकल्पनेतील नांदेडचा नवा चेहरा कसा असेल, यावर अधिकाधिक भर दिला आहे. ‘आम्ही हे केले’ असे समर्पक शीर्षक देत भाजपाने मागील काळात शहरात केलेल्या अनेकोनेक विकासकामांची उजळणी केली आहे.