Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे राज्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 12:23 PM
MP Sanjay Raut Press conference on tipu sultan and shivaji maharaj compare in maharashtra

MP Sanjay Raut Press conference on tipu sultan and shivaji maharaj compare in maharashtra

Follow Us
Follow Us:
  • टिपू सुलतानवरुन राज्यामध्ये वाद पेटला
  • खासदार संजय राऊतांची टीका
  • भाजपला वाद न तयार करण्याचा इशारा
मुंबई : राज्यामध्ये सध्या टीपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केल्यामुळे राज्यामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही तुलना केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन पुण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक देखील झाली. यामुळे महिला पोलीस, पत्रकार देखील जखमी झाले. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी टीपू सुलतानवरुन भाजपने राज्याचे वातावरण खराब करु नये असा इशारा देखील दिला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “राज्यात वाद निर्माण करणाऱ्या भाजपला कामधंदे नाही. जनतेचे, कष्टकरी लोकांचे, विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र यावर कधीही भाजपने आंदोलन केलेले नाही. परवा मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून लोक मरण पावली हे त्यांचेच पाप आहे. ट्रम्पने देशाला गुलाम केले. त्यावर भाजपने कधी प्रश्न विचारलेत का, पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल,” असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

हे देखील वाचा : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

हे प्रकरण मालेगाव माहपालिकेमध्ये टीपू सुलतानचा फोटो लावण्यावरुन सुरु झाले होते. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानाचा फोटो लावलाय, लोकांना आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो काढण्यात आला. हा विषय तिथेच संपवायला हरकत नव्हती. पण भाजपने याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केले. या आंदोलनाची गरज नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हे सांगायला भाजपची गरज नाही. इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भाजपलाही बदलता येणार नाही. मुळात टिपू सुलतान विषयी भाजप आता ज्या भूमिका मांडतंय, त्यांनी इतिहासात आपण काय भूमिका घेतल्या होत्या, त्याचा रेकॉर्ड तपासावा,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार

पुढे खासदार संजय राऊत यांनी रामनाथ कोविंद यांनी केलेल्या टीपू सुलतानच्या गौरवाचे उदाहरण दिले. खासदार राऊत म्हणाले की, “कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजपने नेमलेले रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानीचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले, त्यांनी टिपू सुलतान विषयी गौरवाची फुलं उधळली होती. तेव्हा तुम्ही का रोखलं नाही. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प सुरु केले. मुंबईंच्या महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं याला समर्थन आहे. त्यामुळे भाजपने टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार करु नये. पुढच्या दोन ते तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. कशाला उगाचच तोंडाला फेस काढताय. महाराष्ट्र बदनाम करु नका. ज्या गोष्टी इतिहासात आहेत, त्याची नोंद आहे, त्या तशाच राहतील,” असेही स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut press conference on tipu sultan and shivaji maharaj compare in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • maharashtra news
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम
2

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
4

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.