
Shivsena Ramdas Kadam Press confernce live on Balasaheb Thackeray Dead Body political news
माजी मंत्री रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणखी गंभीर आरोप उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर केला आहे. रामदास कदम म्हणाले की, अंबादास दानवेला मी निवडून आणलं. ते मला काय शिकवणार बाळासाहेब ठाकरे यांचे विचार. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी दैवत आहेत. आजही मी पूजेला बसतो तेव्हा मी त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, असे रामदास कदम यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, “मी हे स्पष्टपणे सांगतो की आणि हे मी जबाबदारीने सांगतो. दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे मी सांगतो. हे मी खूप जबाबदारीने सांगतो. होऊन जाऊ दे एकदा. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर यावं आणि मी खोटं बोलतोय असं सांगावं,” असा गंभीर आणि खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “माध्यतातून मी सर्व महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की, मी कधीच खोटं बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. हे मी खोट बोलत असेल तर उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन असे केले नाही असं सांगावं. उद्धव ठाकरे हे कपटी आहेत. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत मी. हे संभाषण डायरेक्ट उद्धव ठाकरे आणि माझ्यामधील संवाद आहे. त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाल सांगा,” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.