राज्यात शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरूवात नाशिकमधूनच झाली होती. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्याने ही सभा दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण मानली जात आहे.
गिरणी कामगार कोणी उद्ध्वस्त केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत,म्हणून त्यांनी मराठीचा मुद्दा काढलाय, मात्र त्यांना मराठी माणसाशी काही घेणंदेणं नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन…
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचा आरोप करणार प्रश्न या टीझरमध्ये करण्यात आला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
असेंडियाने संस्थेकडून २५ डिसेंबर रोजी एक सर्वेक्षण केले होते, या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांचा निवडणुकीत किती प्रभाव पडेल का, असे विचारण्यात आले होते.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्जमाघारीची मुदत उलटून गेल्यामुळे ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे कायम राहणार आहेत.
मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी योजना राबवण्यात आल्या, ज्या उबाठाच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाल्या नाहीत, शायना एन.सी. यांनी उबाठावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी हिरवी शाल पांघरलेली आहे. ही शाल भगव्या शालीच्या लाटेत वाहून जाईल अशी टीका आ. प्रसाद लाड यांनी केली आहे. महापालिका निवडणूका, नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चा यासह इतर…
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने व्यापक आणि आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्राऊंड लेव्हलवर उतरून प्रत्येक बूथवर भाजपचा प्रचार करणार आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत भगवा उंच उडेल आणि महायुतीचा महापौर निवडून येईल, काय आहे नक्की प्रकरण
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महापालिका निवडणुकीमध्ये युती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी शिवशक्ती वचननामा असा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत बंडखोरीची शक्यता लक्षात घेता ठाकरे गटाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.
इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेने मोठा निर्णय जाहीर केला आहे. ठाकरेंची शिवसेना कोणाशीही युती किंवा आघाडी करणार नाही.
उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी (Candidates List) जाहीर होण्यापूर्वीच पक्षाकडून एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गळती लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवावी की पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवावे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.