Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

परभणीत उबाठा गटाचे २५ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत उबाठाने काँग्रेससोबत युती करुन सय्यद इक्बाल यांना महापौर पदी बसवले. याचदरम्यान शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची खरमरीत टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2026 | 04:33 PM
परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Follow Us
Follow Us:
  • परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला
  • शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची खरमरीत टीका
  • मुंबईत खान महापौर करण्याचा छुपा अजेंडा मतदारांनी उधळला
मुंबई : परभणी महापालिकेत मुस्लिम महापौर करुन उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा जनतेपुढे आला अशी खरमरीत टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठावर केली. मुंबईत मराठी महापौर बनवण्याचा मुद्दा मराठी मतांसाठी होता का, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला. मुंबईत खान महापौर करण्याचा उबाठाचा छुपा अजेंडा मुंबईकर मतदारांनी उधळून लावला, अशी टीका निरुपम यांनी केली.
संजय निरुपम यांनी सांगितले की, परभणीत उबाठा गटाचे २५ नगरसेवक निवडून आले. परभणी महापालिकेत उबाठाने काँग्रेससोबत युती करुन सय्यद इक्बाल यांना महापौर पदी बसवले.

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

परभणीत मुस्लिम महापौर करुन उबाठाचे मुंबईवर लक्ष असल्याचा उबाठाचा छुपा अजेंडा समोर आला. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी उबाठा आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबईचा महापौर फक्त मराठी होईल, असा संकल्प केला होता. मात्र परभणी महापालिकेत उबाठाने मुस्लिम नगरसेवकाला महापौरपदी बसवले, मग मुंबईत मराठी महापौर बनवण्याचा मुद्दा मतांसाठी होता का, असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला. उबाठाच्या मुस्लिमधार्जिण्या भूमिकेमुळेच मुंबई महापालिकेत मुंबईकर मतदारांनी उबाठाचा पराभव केला, अशी टीका निरुपम यांनी केली. मुस्लिम महापौर केल्यानं निवडणुकीत उबाठाची स्पर्धा एमआयएम, काँग्रेस आणि मुस्लिम पक्ष व संघटनांशी होईल, असे निरुपम म्हणाले.

बाळासाहेबांनी देशभक्त मुस्लिमांना कधीही विरोध केला नाही. भारतावर प्रेम करणारे मुस्लिम आमचे आहेत, असे बाळासाहेब म्हणायचे. उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसी विचारधारा स्वीकारली अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदू समाजाच्या हिताचे रक्षण करणाचे आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, असे ते म्हणाले. मुंबईतील बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

तसेच शिवसेना नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाच्या चिंता आणि इतर मुद्द्यांना उत्तर दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की २०२९ पर्यंत पक्षाची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. निरुपम म्हणाले, “हे शेख चिल्लीच्या स्वप्नासारखे आहे. देशभरातील काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता, मला वाटते की २०२९ पर्यंत ते आणखी कमकुवत होईल. पक्षाचा जनसमर्थन आणखी कमी होईल.”

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

 

Web Title: In parbhani the face of muslim leader ubatha came to the fore sanjay nirupam sharp criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Sanjay Nirupam
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
3

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
4

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.