Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा

अंबरनाथमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये युती झाली आहे. मात्र या युतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 07, 2026 | 01:51 PM
Shivsena Thackeray group leader Ambadas Danve criticizes the BJP-Congress alliance in Ambernath

Shivsena Thackeray group leader Ambadas Danve criticizes the BJP-Congress alliance in Ambernath

Follow Us
Close
Follow Us:
  • अंबरनाथमध्ये भाजप आणि कॉंग्रेसची युती
  • यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक
  • ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा जोरदार प्रहार
मुंबई : राज्यामध्ये 29 पालिकांच्या निवडणूका (Local Body Elections) जाहीर करण्यात आल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल हाती येऊन चित्र स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी सोयीस्कर युती केल्याने राजकारण तापले. पालिका निवडणुकीसाठी दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Thackeray Brothers Alliance) एकत्र आले आहेत. यामुळे काँग्रेसने जोरदार टीका केली. मात्र आता अंबरनाथमध्ये कॉंग्रेसने चक्क भाजपसोबत हातमिळवणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप घेत जोरदार टीकास्त्र डागले.

काय म्हणाले अंबादास दानवे?
कॉंग्रेस आणि भाजपच्या युतीवर टीका करताना अंबादासा दानवे म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेससोबत असताना आमच्यावर सातत्याने टीका केली जात होती. आता हीच काँग्रेस अंबरनाथमध्ये भाजपसोबत आहे. संजय राऊत यांनी याबाबत अतिशय योग्य शब्द वापरला आहे — दुतोंडी गांडूळ. भाजप म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. गांडूळ जसं इकडच्या तोंडानेही चालतं आणि तिकडच्या तोंडानेही चालतं, तसंच भाजप करत आहे. सध्या गांडूळाचं काम भाजप करत आहे; फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात करत आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार

भाजप आणि एमआयएम नेहमीच एकत्र

भाजपकडून अकोल्याच्या आकोटमध्ये थेट एमआयएमशी युती करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी यावर टीका केली जात आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, “अकोट आणि जुना भाईंदरमध्ये अशा प्रकारे युती झाली आहे. त्यामुळे आमच्यासोबत आलेले मुसलमान ‘ना पाक’ आणि त्यांच्या सोबत गेलेले ‘पाक’ अशी भाषा वापरणारेच लोक एमआयएम आणि ओवैसींवर टीका करत होते. एमआयएम विकासावर बोलत नाही. एमआयएमविरोधात भाजपचे उमेदवार नाहीत आणि भाजपविरोधात एमआयएमचे उमेदवार नाहीत. ओवैसी त्यांच्या हितासाठीच काम करतात, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. आता भाजप आणि एमआयएम उघडपणे एकत्र काम करत आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती

त्याचबरोबर महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. उघड उघड भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. याबाबत दानवे म्हणाले की, “वडेट्टीवार यांनी काहीही चुकीचे बोललेले नाही. भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने सध्या एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू आहे, त्यावरूनच दोन्ही पक्ष भाजपसाठी ओझे झाले असल्याचं दिसतं. हे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट होत आहे. कधीतरी भाजप हे ओझं खाली उतरवेल, अशीच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

हे देखील वाचा : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा

त्याचबरोबर मनपा आयुक्तांकडून अंबादास दानवेंना नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, “मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही. आयुक्तांचा फोन आला होता; मात्र फोनवरून मी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. अधिकृत नोटीस आल्यानंतर सर्व पुरावे आणि खुलासे सादर करण्यास मी पूर्णपणे तयार आहे,” अशी स्पष्ट भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली.

Web Title: Shivsena thackeray group leader ambadas danve criticizes the bjp congress alliance in ambernath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !
1

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !

BMC Elections 2026 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
2

BMC Elections 2026 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ
3

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

Amravati Election 2026 : महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका
4

Amravati Election 2026 : महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.