SP leader Akhilesh Yadav Raction on Abu Azmi suspension
लखनऊ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे सध्या चर्चेमध्ये आले आहे. अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेबाशी संबंधित एका विधानामुळे अबू आझमी यांच्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली. या वक्तव्यामुळेच अबू आझमी यांना एकमताने महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर ही कारवाई झाल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समाजवादी पक्षाच्या प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर लिहिले की, “जर निलंबनाचा आधार विचारसरणीने प्रभावित होऊ लागला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीत काय फरक राहील. आपले आमदार असोत किंवा खासदार, त्यांचे निर्भय शहाणपण अतुलनीय आहे. जर काही लोकांना असे वाटत असेल की ‘निलंबन’ करून सत्याची जीभ दाबता येते, तर हा त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा आहे. आजचा मुक्त विचार म्हणतो, आम्हाला भाजप नको आहे! असे स्पष्ट मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
निलंबन का आधार यदि विचारधारा से प्रभावित होने लगेगा तो अभिव्यक्ति की स्वतंत्रता और परतंत्रता में क्या अंतर रह जाएगा। हमारे विधायक हों या सांसद उनकी बेख़ौफ़ दानिशमंदी बेमिसाल है। कुछ लोग अगर सोचते हैं कि ‘निलंबन’ से सच की ज़ुबान पर कोई लगाम लगा सकता है तो फिर ये उनकी नकारात्मक सोच…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 5, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या पोस्टमुळे त्यांनी एकप्रकारे अबू आझमी यांची पाठराखण केली असल्याचे दिसत आहे. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील मोठी खडाजंगी झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली. समाजवादी पक्षाने अबू आझमी यांच्या विधानाचे खंडन करावे. त्यांना पक्षातून हाकलून लावा. नाहीतर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन या, आम्ही त्याच्यावर उपचार करू”, या कडक शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “किमान ज्यांचे नाव घेऊन तुमचा पक्ष राजकारण करतो त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचे आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत. तुम्ही जाऊन शाहजहानचे चरित्र वाचावे. औरंगजेब भारताच्या श्रद्धेवर हल्ला करणार होता, तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता, कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही,” असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.