Photo Credit- Social Media 'हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे का?' नारायण राणेंच्या दाव्यावर दमानियांचा थेट सवाल
बीड : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यांवरुन ते रंगते आहेत. काल (दि.03) अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेक पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. यानंतर आता भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर देखील अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे. वाईट कामं करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे,” अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे तुरुंगातून बाहेर आलेले लोकं घेतले जातात. यापूर्वीदेखील असं घडलं आहे. तोच प्रकार आता पुन्हा झाला आहे. जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात घेतलं आहे. मंत्री झाल्यावर गोरे यांनी पुन्हा त्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी मी केली आहे,” असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “काल रात्री मला अशी माहिती मिळाली की स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला जयकुमार गोरे गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर जयकुमार गोरे तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी परत त्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. आता ते मंत्री झाले आहेत. आता त्यांचा त्रास आणखी वाढला आहे,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.