Pune Firing News : पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल, पुण्याचं पालकत्व घेण्याची फडणवीसांना केली विनंती

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयता हल्ल्याची घटना घडली. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल
पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवालपुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Published on: 
Updated on: 
  • पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

  • सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना मोठी विनंती

  • पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसणार तरी कधी, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारण शहरातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) भरदिवसा गोळीबाराचा प्रयत्न आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या असून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याचं पालकत्व घेण्याची मागणी केली आहे.

बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मंदार किवळे हे न्यायालयीन कामकाज आटोपून बाहेर आले. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठलं. सुरुवातीला पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर धारदार कोयत्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल
'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

पोलिसांची तातडीने कारवाई

भरदिवसा आणि न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जखमी मंदार यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रांसह काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले. पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असून सुरक्षित शहर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र, शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं.

'पुण्याचं पालकत्व घ्या'; सुळेंची मागणी

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न त्यांनी याआधीही उपस्थित केला आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारावं आणि अशा घटना थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. पोलिसांबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं सांगतानाच पुण्यात आल्यावर नेमकं काय होतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, न्यायालयाच्या परिसरातच अशा प्रकारचा हल्ला होणं हा शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. आता या प्रकरणाचा तपास करताना पोलीस काय माहिती समोर आणतात आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतं, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!