Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abu Azmi यांच्या वक्तव्याचे UP विधानसभेत पडसाद; योगी आदित्यनाथ चांगलेच भडकले, सुनावले खडेबोल

समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये पडसाद पडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2025 | 02:40 PM
UP CM Yogi Adityanath criticizes Abu Azmi's controversial statement Chhatrapati Shivaji Maharaj

UP CM Yogi Adityanath criticizes Abu Azmi's controversial statement Chhatrapati Shivaji Maharaj

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मागील तिन्ही दिवस अधिवेशन जोरदार गाजत आहे. काल (दि.04) अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे अधिवेशन गाजले. तर आज (दि.05) समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या वक्तव्याचे आता उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील पडसाद पहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशच्या विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. समाजवादी पक्षाने अबू आझमी यांच्या विधानाचे खंडन करावे. त्यांना पक्षातून हाकलून लावा. नाहीतर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन या, आम्ही त्याच्यावर उपचार करू, या कडक शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी रोष व्यक्त केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “किमान ज्यांचे नाव घेऊन तुमचा पक्ष राजकारण करतो त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचे आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत. तुम्ही जाऊन शाहजहानचे चरित्र वाचावे. औरंगजेब भारताच्या श्रद्धेवर हल्ला करणार होता, तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता, कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही,” असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.

औरंगजेब को समाजवादी पार्टी अपना आदर्श मानती है…

जो औरंगजेब को अपना नायक मान रहा हो उसको भारत में रहने का अधिकार नहीं…

अपने विधायक को एक बार उत्तर प्रदेश में भेज दीजिए बाकी उपचार हम करवा देंगे… pic.twitter.com/6YbSY2cJ77

— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 5, 2025

पुढे ते म्हणाले की, “अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत आणि औरंगजेबाला त्यांचे आदर्श मानतात. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्या ‘कम्बख्त’ला पक्षातून हाकलून लावा… त्याला उत्तर प्रदेशला बोलवा, आम्ही त्याच्यावर उपचार करू. उत्तर प्रदेशचे लोक त्याच्याशी चांगले वागतील. समाजवादी पक्षाने औरंगजेबाला आदर्श मानून या विधानाचे खंडन करावे,” अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबनाची कारवाई

समाजवादी पार्टीचे नेते व  मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. तसेच औरंगजेबाचे कौतुक देखील केले.  “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळातून त्यांचे एकमताने निलंबन करण्यात आले. तर उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील खडाजंगी झाली.

Web Title: Up cm yogi adityanath criticizes abu azmis controversial statement chhatrapati shivaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
1

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Yogi Adityanath on Delhi Visit: योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर; यूपी BJP प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग
2

Yogi Adityanath on Delhi Visit: योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर; यूपी BJP प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग

शिवरायांचे 12 किल्ले UNESCO च्या वारसा यादीत, पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,”मी सर्वांना आवाहन करतो की…
3

शिवरायांचे 12 किल्ले UNESCO च्या वारसा यादीत, पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,”मी सर्वांना आवाहन करतो की…

CM Yogi Adityanath : SC, ST, OBC सर्वांना आरक्षण मिळेल… आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुख्यमंत्र्यांचे नवीन नियम
4

CM Yogi Adityanath : SC, ST, OBC सर्वांना आरक्षण मिळेल… आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुख्यमंत्र्यांचे नवीन नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.