Maharashtra Politics: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून काँग्रेसकडून सातत्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी जवळजवळ प्रत्येक व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांमध्ये हेराफेरीचे आरोप करत आहेत.
या सगळ्यात राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात त्यांनी ४१ लाख मतांच्या वाढीबाबत शंका व्यक्त करत काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. राहूल गांधी यांनी या लेखात भाजपने हेराफेरी करून निवडणूक कशी जिंकली, हे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या या लेखामुळे महाराष्ट्र सरकार विरूद्ध राहूल गांधी असा नवा संघर्ष उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या संघर्षात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील उडी घेतली आहे.
Maharashtra Politics : ‘नितेश राणे जरा जपून बोला…’; मोठ्या राणेंनी धाकट्या राणेंचे टोचले कान
राहुल गांधी यांनी लेखात भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३० लाख मतदार वाढले होते. त्यावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाशी संगनमत करून घोटाळा केला होता का?” असा प्रश्न विचारत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
बावनकुळे म्हणाले की, एप्रिल २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ७,२९,५४,००० मतदार होते. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळी मतदारांची संख्या ७,५९,६८,००० पर्यंत वाढली. फक्त ५ महिन्यांत मतदारांची संख्या ३० लाखांनी वाढली. मग त्यावेळी तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की, त्यावेळीही काँग्रेस आणि आयोगाची मिलीभगत होती. संगनमत होते? तेव्हा तुम्हीही फसवणूक केली का याचे उत्तर द्या.
बानवकुळे म्हणाले की, २००४ आणि २००९ च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. तेव्हा कोणतेही प्रश्न उपस्थित झाले नाहीत, पण आज जेव्हा तुम्ही हरलात आणि राज्यातील जनतेने तुम्हाला सत्तेतून उतरवले तर तुम्ही रडू लागलात. अपूर्ण डेटा देऊन देशात गोंधळ निर्माण करण्याचे व्यर्थ प्रयत्न करू नका, असा टोलाही त्यांनी केला. तसेच, तुमच्या पराभवासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रानंतर आता बिहारचे लोकही तुम्हाला धडा शिकवणार आहेत. वारंवार खोटे बोलून तुम्ही राज्यातील जनतेचा अपमान करत आहे. जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
House Numerology: तुमच्या घरावरील नंबरामुळे समजेल तुमचे भाग्य, जाणून परिणाम आणि उपाय
कामठीच्या गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचाच अभ्यास केला तर पराभवाचे कारण स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन मतदार नोंदणी केली. एकट्या कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने १७,००० मतदारांची नोंदणी केली आहे. जर आपण कामठीच्या ट्रेंडचा अभ्यास केला तर आपल्याला काँग्रेसच्या पराभवाचे कारण समजेल.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी या वादात आता विजय वडेट्टीवार यांनी उडी घेतली आहे. विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यांनी बावनकुळे यांना या मुद्द्यावर चर्चेचे आव्हानही दिले. वडेट्टीवार म्हणाले की, २०१४ आणि २००९ च्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा टक्का फक्त ३ टक्क्यांनी वाढला होता. तर २०२४ मध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर तो सुमारे ८.७४ टक्क्यांनी वाढला आहे. कामठीचे उदाहरण देत राहुल गांधी यांनी विचारले आहे की ५ महिन्यांत ३५,००० वाढलेली मते कुठून आली? हे उघड करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकण्यासाठी बेईमानी करण्यात आले. राहुल गांधी जे म्हणाले ते बरोबर आहे. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे उघड करावे. बावनकुळे यांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, खोटी आकडेवारी देऊन ते दिशाभूल करत आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तर या विषयावर चर्चेसाठी पुढे या, असे खुले आव्हानही वडेट्टीवार यांनी केलं आहे.