नितेश राणे जरा जपून बोला...; मोठ्या राणेंनी धाकट्या राणेंचे टोचले कान
कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आमदार निलेश राणे यांनी त्यांचेच बंधू आणि मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा सुरू आहे. नितेश राणे यांनी जरा जपून बोलावं असं म्हणत त्यांनी कान टोचले आहेत. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली व्हायरल होत आहे.
bacchu kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु; नेमकी मागणी तरी काय?
‘नितेशने जरा जपून बोलावं. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना भान ठेवून बोलण्याची गरज आहे. आपल्या बोलण्यामुळे कोणाचा फायदा होतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी आपल्या महायुतीतील मित्र पक्षांना भरसभेत इशारा दिला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी पोस्ट करत त्यांना सल्ला दिला आहे.
नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.
सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.
आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2025
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे सर्वांनी लक्षात ठेवा, असा धमक वजा इशारा त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिला आहे. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचलं तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला होता.
निलेशजी तुम्ही tax free आहात 😅
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 8, 2025
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत. दरम्यान भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीवरून प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. या जिल्हा नियोजन समिती निधीवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. त्यावरून नितेश राणेंनी शिवसेने इशारा दिला होता.