फोटो सौजन्य- pinterest
नवीन घर खरेदी केल्यावर घरा इतका घराचा नंबरही महत्त्वाचा असतो. घरावरील नंबर शुभ असल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते अथवा अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या घरावरील नंबराचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये संख्या ही महत्त्वाची असते. तुम्ही ज्या इमारती, बंगला इत्यादी ठिकाणी राहात असाल तेथील क्रमांक शुभ असल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वप्रकारच्या सुख सुविधांचा आस्वाद घेता येतो. जर घरावरील संख्या शुभ असल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात पण ती संख्या अशुभ असल्यास त्या व्यक्तीला जीवनामध्ये अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
अशुभ घटना घडणे म्हणजे जर एखादी व्यक्ती जीवनात प्रत्येक क्षणाला कमावलेला पैसा एखाद्या गोष्टीत गुंतवत असेल तर ते सर्व पैसे वाया जाणे होय. प्रत्येक परिस्थितीत घराचे शुभत्व राखणे महत्त्वाचे आहे. अशा शुभ घटना जेव्हा घडतात तेव्हा तुमचा घर क्रमांक तुमच्यासाठी अनुकूल असतो. जर घर क्रमांक शुभ असल्यास शुभ लाभ मिळतात. जाणून घ्या घरावरील नंबरचे शुभ अशुभ परिणाम
जर एखाद्या व्यक्तीच्या घरावर अशुभ नंबर असेल तर त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या आजांराशी सामना करावा लागतो. घरातील सदस्याने घरात प्रवेश करताच कुटुंबातील सदस्यांशी भांडणे सुरु होतात. लोकांमधील संघर्ष इतका वाढल्यास तो अमर्याद ओलांडतो. घरांमध्ये पती पत्नी एकत्र राहून सुद्धा एकमेंकाशी बोलणे टाळतात. घरावर अशुभ नंबर असल्यास घरात राहणाऱ्या परिवाराला जीवनामध्ये अनेक अपघातांना सामोरे जावे लागते.
घरात प्रत्येक वेळी शुभता असणे आवश्यक आहे, तरच घरात शुभता राहते, असे म्हटले जाते. प्रत्येक संख्येला स्वतःचे असे महत्त्व असते. एखाद्या व्यक्तीला त्याचे भाग्य चमकवण्यासाठी घराच्या संख्येची जुळणी करुन घ्यावी लागते. यामुळे व्यक्तीसाठी एखादी संख्या निश्चित केली जाते. जर घराचा नंबर अनुकूल नसल्यास तुम्हाला घरावरील नंबर बदलणे चांगले राहील. जर कोणत्या व्यक्तीला नंबर बदलायचा नसल्यास त्या क्रमांकाच्या पुढे एखादे अक्षर जोडणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. असे करणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरावरील संख्या शुभ असते त्या घरात राहिल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)