Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कधी लागणार आचारसंहिता?

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण रंगले आहे. यानंतर आता राज्यामध्ये निवडणूका जाहीर होण्याची आणि आचारसंहिता लागण्याची तारीख समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 03, 2024 | 03:04 PM
वैजापूर विधानसभेसाठी ३० जणांचे अर्ज

वैजापूर विधानसभेसाठी ३० जणांचे अर्ज

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु झाली. लोकसभेचा निकाल अपेक्षित न लागल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन गेले आहे. यानंतर आता राज्यामध्ये निवडणूकीची तारीख समोर आली आहे.

राज्यामध्ये सर्वच पक्ष विधानसभा निवडणूकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा देखील उडाला आहे. आता राज्यामध्ये दसऱ्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा ही येत्या  13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यामध्ये ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांचे सभा, बैठका आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे.

हे देखील वाचा : लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा; ‘शक्ती बॉक्स’ ठरणार महिलांचा तारणहार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या  8  ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.  10  ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे.   नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही . दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागेल. 13 ऑक्टोबरला  रविवार आहे. 14  तारखेनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होऊ शक्यता आहे.  त्यामुळे आता सर्व पक्षांची तयारी सुरु झाली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरु

महाविकास आघाडीची जागावाटपांची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मुंबईच्या काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. मात्र चर्चा सुरु असून हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. महायुती देखील राज्यामध्ये पहिल्यांदाच एकत्रित विधानसभा निवडणूका लढत आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये राजकारण जोरदार रंगले असून दिल्ली दौरे वाढले आहे. प्रचारासाठी यात्रा काढल्या जात आहे.

Web Title: When maharashtra vidhan sabha election 2024 will be held and what is the date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Vidhansabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.