Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल

आ. सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसमोरील अडचणी सभागृहात मांडल्या. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर परिणाम झाला

  • By anuradha sagar
Updated On: Mar 07, 2026 | 09:43 AM
Sangali News: तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल
Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी आक्रमक
  • लक्षवेधीद्वारे द्राक्ष उत्पादन, नियांत अडथळे, संशोधन केंद्र आणि आयात धोरणाच्या प्रश्नांवर शासनाला सवाल
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली येथे द्राक्ष संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले होते
Sangli Grape Farmers :  राज्यातील प्रमुख द्राक्ष पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा राज्य विधानसभेच्या अधिवेशनात जोरदारपणे मांडला गेला. सांगली जिल्ह्यातील आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे द्राक्ष उत्पादन, नियांत अडथळे, संशोधन केंद्र आणि आयात धोरणाच्या प्रश्नांवर शासनाला धारेवर धरले. सांगली जिल्हा हा राज्यातील द्राक्ष उत्पादनासाठी अग्रस्थानी असलेला जिल्हा मानला जातो.

जिल्ह्यात अंदाजे २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड असून दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन घेतले जाते. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस, मिरज आणि जत है तालुके द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तासगाव परिसराला राज्यात द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. सांगली जिल्ह्यातील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेसह युरोप, आखाती देश आणि आशियातील विविध देशांमध्ये निर्यात केली जातात.

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..!

सांगलीचा द्राक्ष पट्टा : महत्त्वाची आकडेवारी
द्राक्ष लागवड क्षेत्र : सुमारे २५ ते ३० हजार हेक्टर
वार्षिक उत्पादन: ५ ते ६ लाख मेट्रिक टन

तालुके प्रमुख
तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस, मिरज, जत
दरवर्षी निर्यात सुमारे १५०० कंटेनर द्राक्षे
यंदा अडकलेले कंटेनर : सुमारे ७००
एक एकर द्राक्षचाग खर्च : ४ ते ५ लाख रुपये
यंदा नुकसान: ५० टक्क्यांपेक्षा जास्त बागा फेल

 

संशोधन केंद्राचे काय झाले ? आ. डॉ. विश्वजीत कदम

अधिवेशनात आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीतील द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधताना सांगली येथे मंजूर झालेले द्राक्ष संशोधन केंद्र नेमके कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली येथे द्राक्ष संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले होते आणि अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर या केंद्राबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. अनियमित पाऊस, वातावरणीय बदल, वाढता उत्पादन खर्च णि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक तणावात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्यात ठप्प; ७०० कंटेनर अडकले : आ. सुहास बाबर

आ. सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसमोरील अडचणी सभागृहात मांडल्या. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर परिणाम झाला असून जेएनपीटी बंदरावर सांगली जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक द्राक्ष कंटेनर अडकून पडले असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी सांगली जिल्ह्यातून साधारण १५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात केली जाते आणि या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र सध्याच्या परिस्थितीत निर्यात ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यासाठी जागा करून उपलब्ध देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…

बेदाणा आयात धोरणावर प्रश्न : आ. रोहित पाटील

तासगाव-कवठेमहांकाळचे आ. रोहित आर. आर. पाटील यांनी लक्षवेधी क्र. ४ च्या माध्यमातून द्राक्ष व बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. परदेशातून येणाऱ्या कमी दर्जाच्या अफगाणी व इतर बेदाण्यांच्या आयातीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आयात मालाची कठोर गुणवत्ता तपासणी, सीमाशुल्क वाढ आणि शेतकरी हिताचे धोरण राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. वाढता उत्पादन खर्च, हवामान बदल, गारपीट आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचेही त्यांनी सांगितले, तासगाव येथे ‘टेबल ग्रेप्स साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी सभागृहात मांडली.

 

Web Title: Why is tasgaons grape research center being neglected sangli mlas question the government through lakshvedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Sangli

संबंधित बातम्या

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा
2

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.