Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad: “गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार”; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरतशेठ गोगावले यांनी जी ताकद आपल्या पाठीशी उभी केली त्याची व्याजासहित परतफेड करा. असं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2024 | 12:19 PM
"गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार"; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन

"गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार"; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

माणगाव: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान रायगडमध्ये महायुती अ‍ॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. 194 महाड विधानसभा महायुतीचे उमेदवार भरत शेठ गोगावले यांची प्रचार सभा 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथे पार पडली. या सभेस लोणेरे पंचायत समिती गण व मांजरवणे पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये मुस्लिम समाजातील बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. आयोजित सभेत संबोधित करताना गोरेगावचे सरपंच जुबेर भाई अब्बासी यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असूनही संकटात असताना भरतशेठ गोगावलेंनी आपल्याला केलेल्या मदतीची आठवण करून दिली. भरत गोगावले कधीही पक्ष बघत नाहीत, तर नि:पक्षपाती काम करण्याकडे त्यांचा कल असतो असं अब्बासी यांनी सांगितले. गोरेगावमध्ये जो विकास झाला तो विकास केवळ आपल्या आणि खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झाला आहे. तटकरे यांच्या आदेशाने आम्ही शब्द देतो की, या परिसरातील संपूर्ण राष्ट्रवादी भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं वचन अब्बासी यांनी उपस्थितांसमोर दिले.

हेही वाचा-राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी ! आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष

आमदार भरत शेठ गोगावले यांनी सभेत हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित केले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, रायगडचे भूमिपुत्र बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी केलेल्या महत्त्वाच्या विकास कामांची आठवण गोगावलेंनी करुन दिली. महाड विधानसभेमध्ये आपण देखील सर्व जाती-धर्मांच्या बेड्या तोडून विकास कामे करीत असल्याची जाणीव उपस्थित जनसमुदायाला करून दिली. गोगावले म्हणाले की, “विरोधकांकडे कोणतेही भांडवल नाही, गावातील हेव्या देव्यामुळे विरोधक गावात मत मागायला येतात, मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका: असं आवाहन त्यांनी केलं. गोगावले पुढे असंही म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात पहिली योजना महिलांच्या कल्याणासाठी आणली. महिलावर्ग एसटी बस मध्ये अर्ध्या तिकिटाच्या किंमतीत प्रवास करु शकतात ते केवळ महायुती सरकारमुळे. यासोबतच ‘लेक लाडली लखपती योजना’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’, ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’, ‘वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना’, ‘फुकट राशन’, ‘आनंदाचा शिधा’ आदी लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत.

हेही वाचा-या’ मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी कायम ! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि कॉंग्रेसची वेगळी भूमिका

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलीच तर, काल प्रकाशित झालेल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रति महा 1500 रुपये यामध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा असे आवाहन आमदार भरत शेठ गोगावले यांनी केले. पुढे ते असंही म्हणाले की, आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झाल्यापासून आमचा विचारांना मूठ माती दिली, असा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष विचार मांडला आहे, त्या विचारांशी आमची बांधिलकी अजूनही आहे. म्हणूनच मुस्लिम समाजाच्या भगिनी आज मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे उदगार सुनिल तटकरे यांनी काढले. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि याचा लाभ 2 कोटी 25 लाख महिलांना मिळाला. परंतु या योजनेला विरोध करण्याचा सामाजिक पाप महाविकास विकास आघाडीच्या सरकारने केल. ती योजना बंद पडावी म्हणून काही लोकांना हाताशी धरून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं काम यांनी केलं याची आठवण सभेस संबोधित करताना करून दिली.

संपूर्ण देशभरामध्ये विकसित राज्य अशी ओळख महाराष्ट्राची आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये अधिक वेगाने विकासाची काम भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरतशेठ गोगावले यांनी जी ताकद आपल्या पाठीशी उभी केली त्याची व्याजासहित परतफेड करा ,असे आवाहन जाहीर सभेतून तटकरे यांनी केले. जे मत तुम्ही सुनील तटकरेंना केले तेच मत भरतशेठ गोगावले यांना करा आणि पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करा, असं सुनील तटकरे यांनी जनतेला सांगितवलं आहे.

 

 

Web Title: Will be committed to the overall development of goregaon mla bharatsheth gogawles assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
1

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
2

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले
3

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
4

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.