Yogi Adityanath has reacted to the Waqf Board Amendment Bill
उत्तर प्रदेश : देशामध्ये सध्या वक्फ बोर्डमधून राजकारण तापले आहे. लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले. पहाटेच्या सुमारास हे विधेयक पारित करण्यात आले असून यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी विरोधातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्डवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच प्रयागराजच्या जमिनीवरुन टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाषण दिले. यावेळी त्यांनी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्याच्या यशस्वी सांगतेचा पुन्हा एकदा उल्लेख केला. ते म्हणाले की, “प्रयागराजला पुन्हा एकदा 580 कोटी रुपयांचे मूल्य असणारे प्रकल्प निधी देण्यात येत आहे. आपलं प्रयागराज हे सामान्य रुपातील इलाहबाद राहिले आहे. आता हे प्रयागराज झाले आहे. प्रयागचा अर्थ मीलनाचे ठिकाण होते. आणि प्रयागराजचा आता म्हणजे महामीलनस्थळ आहे. मॉं गंगा, यमुना आणि सरस्वती देखील येथेच मिळतात. नद्यांबरोबरच राम आणि निषादराज यांचे देखील मीलन झाले होते,” अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या होत्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे योगी म्हणाले की, “महाकुंभाच्या तयारीदरम्यान वक्फ बोर्डाने कुंभमेळ्याची जमीन त्यांची असल्याचा दावा केला होता. ते एक जमीन माफिया मंडळ बनले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या मनमानी कारभाराला आळा घातला आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित एक महत्त्वाचा कायदा (वक्फ सुधारणा विधेयक २०२५) लोकसभेत मंजूर झाला आहे आणि लवकरच राज्यसभेत मंजूर होईल, ज्यामुळे तो केवळ कल्याणकारी कामांपुरता मर्यादित राहील. उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारचा माफियावाद खपवून घेतला जाणार नाही, आम्ही येथील माफियांना आधीच हाकलून लावले आहे,” असे मुख्यमंत्री योगी म्हणाले आहेत.
https://x.com/myogiadityanath/status/1907718856052728266
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
योगी आदित्यनाथ म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. येथे भव्य आणि दिव्य कुंभमेळा झाला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. त्याचबरोबर अमित शाह यांचे देखील धन्यवाद मानतो. त्यांनी वक्फ बोर्डच्या मनमानी कारभाराला आळा घातला. देशमध्ये प्रतिनिष्ठा असली पाहिजे. नीती चांगली असेल तर मार्ग निघतोच. प्रयागराज ही एक पुण्यभूमी आहे. तिथे प्रत्येक जगातील भाविक नतमस्तक होत होता. मात्र या माफियांनी प्रयागराजवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. इथल्या अस्तित्वासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते. तसेच लोकांच्या अस्तित्वाशी खेळण्याचा प्रयत्न करत होते. जो कोणी आवाज काढेल त्याला मारले जात होते. त्यांना गायब केले जात होते. आता मात्र हे चालणार नाही. राज्यात अत्याचार चालणार नाही,” असे स्पष्ट योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.