फोटो सौजन्य- pinterest
गणपती बाप्पाला आपण काही दिवसांत निरोप देणार आहोत. यंदा अनंत चतुर्दशीचा सण शनिवार, 6 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. अनंद चतुर्दशीच्या दिवशी गणेसोत्सव समाप्त होतो. यावेळी भाविक पुढच्या वर्षी परत येण्याच्या वचनासह गणपती बाप्पाला भावनिक होऊन निरोप देतात. धार्मिक मान्यतेनुसार, बाप्पाच्या विसर्जनानंतर काही गोष्टींचे दान केल्याने त्यांची कायम आपल्या कुटुंबावर कृपा राहते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या.
गणेश विसर्जनानंतर अन्न आणि वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही एखाद्या गरजूवंतांना धान्य, तांदूळ किंवा डाळ, आणि नवीन कपडे दान करू शकता. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारते. तुम्हाला कोणत्याही समस्या जाणवत नाही.
गूळ हा खूप शुभ मानला जातो. त्यासोबतच गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून देखील गूळ मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गूळ दान केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात, असे मानले जाते. तुम्ही गुळाचे दान मंदिरात किंवा गरीब व्यक्तींना करु शकतात. यामुळे तुमच्या जीवनात गोडवा आणि आनंद येतो.
नारळाला हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो. त्यामुळे शुभ कार्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. म्हणून नारळाचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. नारळ वाहत्या नदीत तरंगवू शकता किंवा गरजू व्यक्तीला देऊ शकता. नारळाचे दान केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ आहे. विसर्जनानंतर तुम्ही मोदक आणि इतर मिठाईचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही मंदिरात किंवा गरिबांमध्ये मोदक आणि मिठाई वाटू शकता. असे केल्याने तुम्हाला गणपती बाप्पाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
हिंदू धर्मामध्ये दानाला विशेष महत्त्व आहे. गणपतीला विघ्नांचा नाश करणारा आणि आनंद देणारा म्हटले आहे. ज्यावेळी बाप्पाला निरोप दिला जातो त्यावेळी भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी निश्चितच दान आणि सत्कर्म करतात. असे मानले जाते की, या दानामुळे गरिबी दूर होऊन सौभाग्य वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)