फोटो सौजन्य- pinterest
पितृपक्ष हा हिंदू धर्मामधील एक विशेष काळ मानला जातो. या काळ आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्यासाठी पुण्य मिळविण्यासाठी विशेष पूजा आणि तर्पण करतो. यावेळी लोकांना स्वप्नात वेगवेगळे प्राणी दिसतात त्याचा संबंध असा होतो की, पूर्वजांच्या नाराजीचे किंवा संदेशाचे लक्षण मानले जातात. ही स्वप्ने केवळ कल्पनारम्य नसून आपल्या कर्माशी आणि पूर्वजांच्या अपेक्षांशी संबंधित असतात. जर श्राद्ध आणि तर्पण योग्यरित्या झाले नाही तर अशी स्वप्ने पडतात, असे म्हटले जाते. पितृपक्षात कोणती स्वप्ने दिसल्यास सावधगिरी बाळगावी लागते, जाणून घ्या
स्वप्नामध्ये साप दिसणे हे फक्त संकेत नसून शक्तीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला पितृपक्षात साप दिसल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत. काहीवेळा तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी भोग किंवा तर्पण योग्यरित्या केले नसल्यामुळे असे होण्याची शक्यता असते. जर तुमच्या कुंडलीमध्ये काही कमतरता असल्यास काही दुरुस्त असू शकते.
कावळा हा पूर्वजांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. पितृपक्षामध्ये स्वप्नात कावळा दिसण्याचा अर्थ अशुभ मानला जातो. याचा अर्थ तुमचे पूर्वज समाधानी नाही असा होतो आणि त्यांचे आत्मे शांतीच्या शोधात आहेत. यावेळी तुम्हाला तुमच्या श्राद्ध आणि तर्पण विधींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा स्वप्नांकडे कधीही दुर्लक्ष करु नका. कारण पूर्वजांच्या अपेक्षा आणि आशीर्वादांशी त्यांचा थेट संबंध असतो.
स्वप्नात मांजर दिसणे अशुभ आणि धोक्याची सूचना मानली जाते. पितृपक्षात स्वप्नात मांजर दिसल्यास ते पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण असू शकते. तर कधीकधी मांजरीला रडताना पाहणे हे मोठ्या घटनेचे संकेत मानले जाते. पितृदोषापासून सुटका करण्यासाठी काही उपाय आणि विशेष पूजा करणे खूप गरजेचे मानले जाते.
पितृपक्षात स्वप्नामध्ये गिधाड दिसणे खूप गंभीर असे स्वप्न मानले जाते. त्याला मृत्यू, बदल आणि गंभीर इशाऱ्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला पितृपक्षात हे स्वप्न दिसत असल्यास पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही. असा त्याचा अर्थ होतो. या स्वप्नांचा असा देखील अर्थ होतो की, तर्पण किंवा श्राद्ध विधींमध्ये काहीतरी गहाळ आहे किंवा कुटुंबात काहीतरी चूक होत आहे. पितृपक्षातील स्वप्न हे गांभीर्याने घेतले पाहिजे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)