फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.4 वाजता मंगळ ग्रहाने कन्या राशीमध्ये राहून चित्रा नक्षत्रात आपला प्रवेश केला आहे. आता त्याचे हे संक्रमण 23 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मंगळ हा चित्रा नक्षत्राचा स्वामी आहे ज्याचा संबंध सर्जनशीलता, कठोर परिश्रम आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा आहे. या काळामध्ये अनेक राशींच्या लोकांना करिअर, वित्त, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये फायदा होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा धैर्य, ऊर्जा आणि कृतीचे प्रतीक मानला जातो. आता सध्या कन्या राशीमध्ये आहे. ज्यावेळी हा ग्रह कन्या राशीत राहून चित्रा नक्षत्रात संक्रमण करतो त्यावेळी अनेक राशीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात. कोणत्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर राहील. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरीत किंवा नवीन प्रकल्पांमध्ये पदोन्नतीमध्ये यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक किंवा मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याला ऊर्जा मिळेल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या संक्रमणाचा संबंध बौद्धिक आणि संवादाशी आहे. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी निर्माण होतील आणि व्यवसाय वाढेल. शिक्षणाशी संबंधित असलेल्या लोकांना या काळात अपेक्षित लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिरता वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. सामाजिक नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सर्जनशील किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ असणार आहे. हे संक्रमण कन्या राशीमध्ये होणार आहे. यामुळे तुमचा वैयक्तिक विकास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी अचूकतेने यश मिळेल. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांती वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहणार आहे. या काळात करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येईल. या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यातील धैर्य आणि ऊर्जा वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि जुने प्रकल्प प्रगती करतील. जमीन किंवा घर खरेदी-विक्रीसारख्या मालमत्तेशी संबंधित तुम्हाला नफा होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप चांगले राहणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि आर्थिक क्षेत्रात फायदा होईल. व्यवसाय किंवा शिक्षणाशी संबंधित प्रवासातून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)