फोटो सौजन्य- pinterest
तुरटी ही अँटीसेप्टिक या गुणधर्मांनी ओळखली जाते. याचा वापर केवळ जखम स्वच्छ करण्यासाठी केला जातोच. तर याचा वापर ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार तुरटी अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवायची असल्यास तुरटीचा वापर प्रभावी ठरेल. घरात आणि जीवनात शांती राखण्यासाठी तुरटीचे हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरु शकते. घरात तुरटीचे उपाय करण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या
घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता तुरटीमध्ये सर्वांत जास्त असते. त्यामुळे पाण्यामध्ये तुम्ही थो़डी तुरटी टाकून दररोज घर पुसले तर घरामधील दुःख, तणाव आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच घरामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील टिकून राहू शकते.
जर तुमच्या व्यवसायात घट झाली असेल किंवा दुकानात ग्राहकांचा ओघ कमी झाला असल्यास काळ्या कापडामध्ये तुरटी बांधून ते तुमच्या व्यवसायाच्या मुख्य दारावर लटकवा. यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.
जर मुलांना रात्री झोपेमध्ये भयानक स्वप्ने पडत असल्यास किंवा ते झोपेतून घाबरुन उठत असल्यास मंगळवारी किंवा शनिवारी रात्री झोपताना त्यांच्या उशाजवळ 50 ग्रॅम तुरटी ठेवा. हा उपाय केल्याने मुलांना चांगली झोप लागेल. तसेच तुमची मनात असलेली भीती नाहीशी होऊ शकते.
पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्यास किंवा नात्यामध्ये वारंवार तणाव वाढला असेल तर काळ्या कापडामध्ये तुरटी बांधून पलंगाखाली ठेवा. असे केल्याने तुमच्या नात्यातील परस्पर संबंध सुधारू लागतात आणि मानसिक ताण कमी होतो.
तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामध्ये अडकले असाल तर बुधवारी तुरटीच्या तुकड्यावर सिंदूर लावा आणि ते सुपारीच्या पानात गुंडाळा आणि दोरीने बांधा. त्यानंतर ते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दगडाने ते पुरून टाका. असे केल्याने कर्जातून सुटका होण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला पैशांची कमतरता जाणवत असेल तर तुरटी मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करा. वास्तुशास्त्रानुसार, हा उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)