फोटो सौजन्य- istock
आजचा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजचा स्वामी ग्रह शनि आहे. यामुळे आज सर्व राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्यामुळे त्याचा अंक 6 मानला जातो. या लोकांचे नातेसंबंध चांगले राहतील. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांची धावपळ होऊ शकते. तसेच काहींना व्यवसायात फायदा होईल.मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. नकारात्मक विचारापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. तसेच तुमची चिंता वाढू शकते.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी दुसऱ्याच्या हस्तक्षेपामुळे अडचणी येऊ शकतात. मात्र तुम्ही समजूतदारपणा दाखवू शकता. भावंडांसोबत तुम्ही वेळ घालवाल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. मित्राकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत देवाणघेवाण करताना सावध रहावे. कोणाला उधार देऊ नका. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही चितेत राहू शकता. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहा. कोणताही निर्णय घेताना सावध राहा अन्यथा नुकसान होईल. मेहनत घेतल्याने तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज समस्या उद्भवू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. घरातील कामी वाढू शकतात. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मूलांक 6 असणाऱ्या आजचा दिवस सामान्य राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवायला लागेल. घरगुती गोष्टीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकता. आपले महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्याची गरज पडेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामामध्ये बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम पूर्ण होत असताना त्यात समस्या होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)