फोटो सौजन्य- istock
प्रत्येक सण उत्सवाच्या वेळी लहान मुली ते महिलांपर्यंत सर्वच जण हात आणि पायांवर मेहंदी काढतात. यामुळे सौदर्यांत भर पडतेच पण ज्योतिषशास्त्रात ती एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा देखील मानली जाते. लग्नसमारंभ असो किंवा इतर सण उत्सव असो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सण उत्सवामध्ये परंपरा जोडलेल्या असतात. त्यामधीलच एक आषाढ महिना.
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळी ऊर्जा असते आणि त्या महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांचे परिणाम दिसून येतो. यासाठी आषाढ महिना खास मानला जातो. आषाढ महिन्यात मेहंदी लावल्याने सौदर्यांत भर तर पडतेच मात्र जीवनात येणाऱ्या समस्या दूर होणे, मन शांत ठेवण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
जून ते जुलै दरम्यान आषाढ महिन्याची सुरुवात होते. हा काळ हवामान बदलाचा समजला जातो. यामुळे आर्द्रता आणि उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम देखील दिसू लागतात. यावेळी मेहंदी लावल्याने शरीरामधील थंडपणा आणि मन या दोन्हींमधून आराम मिळतो.
मान्यतेनुसार, आषाढ महिन्यात मेहंदी काढल्यानंतर मेहंदीचा रंग जितका गडद येईल तितका तो आपल्यासाठी अधिक शुभ मानले जाते. या रंगामुळे केवळ हातांना शोभा येत नाही तर याचा संबंध ग्रहांच्या हालचालीशी देखील संबंधित असतो. जर तुमच्यावर एखाद्या ग्रहाचा प्रभाव असल्यास तो कमी होण्यास मदत होते. जसे की, मंगळ आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. जर हे ग्रह तुमच्या कुंडलीत असतील आणि तुम्ही मेहंदी काढल्यास या ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे ठरते.
मंगळ ग्रह हा ऊर्जा आणि क्रोधाशी संबंधित आहे तर शुक्र ग्रह प्रेम आणि नातेसंबंधाशी संबंधित असल्याने मेहंदी काढणे हा दोन्ही ग्रहांसाठी संतुलित उपाय मानला जातो.
असे म्हटले जाते की, विवाहित महिलांनी आषाढ महिन्यात मेहंदी काढल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील गोडवा कायम टिकून राहतो. नातेसंबंधात गोडवा राहतो व नात्यामध्ये असलेला ताण कमी होतो. घरात शांतता राहते. तसेच मुलांच्या संबंधित असलेल्या समस्या कमी होण्यास मदत होते. मान्यतेनुसार, मेहंदी लावणे हे अपत्यप्राप्तीसाठी देखील चांगले मानले जाते. ही श्रद्धा पिढ्यानपिढ्या प्रचलित आहे आणि आजही अनेक कुटुंबांमध्ये ती भक्तीने पाळली जाते.
आषाढ महिना हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या महिन्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत पाळले जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. यावेळी भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असल्याचे म्हटले जाते. यावेळी भगवान विष्णूंना मेहंदी अर्पण करणे शुभ मानले जाते.
जेव्हा व्यक्तीला कुंडलीमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव जाणवतो तेव्हा मेहंदी काढणे हे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार आणि बुधवारी मेहंदी लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे मन शांत राहतेच त्यासोबतच नशीबही चमकते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)