Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: वारंवार पाय हलवण्याची सवय तुम्हाला आहे का? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

पायांशी संबंधित वाईट सवयीचा परिणाम शनि, राहू, मंगळ आणि चंद्रावर त्याचा परिणाम होतो. पाय घासत चालणे किंवा घाणेरडे ठेवणे यामुळे मानसिक ताण, आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 11, 2025 | 03:38 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वारंवार पाय हलवण्याची सवय
  • आरोग्यावर होणारे परिणाम
  • ज्योतिषशास्त्रात पाय हलवण्याची सवय
 

आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा संबंध एखाद्या ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. विशेषतः पाय हे जीवनातील स्थिरता, पुढे जाण्याची क्षमता आणि मानसिक संतुलनाशी जोडलेले आहेत. ज्योतिषशास्त्रात पायांशी संबंधित काही सवयी आपल्या ग्रहांच्या कमकुवतपणाचे प्रतिबिंबित करतात. या सवयी बहुतेकदा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असतात, परंतु त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. चालताना पाय घासत चालणे, बसल्यावर सतत पाय हलवणे, घाणेरडे पाय ठेवणे इत्यादी सवयीमुळे शारीरिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ग्रहांच्या प्रभावानुसार देखील नुकसान करतात. ज्यावेळी आपण या सवयींकडे दुर्लक्ष करतो त्यावेळी शनि, राहू, मंगळ आणि चंद्र यासारख्या महत्त्वाच्या ग्रहांचे असंतुलन जीवनात संघर्ष, मानसिक ताण आणि आर्थिक त्रासांच्या स्वरूपात प्रकट होते. या सवयींचा परिणाम केवळ तुमच्या वैयक्तिक जीवनावरच नाही तर तुमच्या कुटुंबावर, संपत्तीवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवरही होतो. कोणत्या वाईट सवयींचा ग्रहांवर कशाप्रकारे प्रभाव पडतो ते जाणून घ्या

पायांशी संबंधित वाईट सवयी आणि ग्रहांचे परिणाम

पाय घासत चालणे

पास घासत चालणे ही केवळ शारीरिक सवय नसून त्याचा संबंध शनि देवाच्या कमकुवतपणाशी देखील आहे. शनि ग्रहाला शिस्त, कृती आणि न्यायाचा कारक मानले जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती सतत पाय घासत चालत असेल त्यावेळी त्या व्यक्तीला आळस आणि अनुशासनहीनतेचे लक्षण असते. या सवयीचा परिणाम राहू ग्रहावर होतो. त्याला गोंधळ, चिंता आणि मानसिक असंतुलनाचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी राहूचा अशुभ परिणाम जाणवतो त्यावेळी त्या व्यक्तीला ताण, मानसिक चिंता आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.

Masik Kalashtami 2025: कालाष्टमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, सर्व त्रास होतील दूर

बसताना पाय हलवणे

बसताना पाय हलवणे ही एक सामान्य सवय वाटू शकते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, ती चंद्राच्या कमकुवतपणाचे प्रतिबिंब आहे. चंद्र मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. ज्यावेळी हा ग्रह कमकुवत स्थितीमध्ये असतो त्यावेळी ती व्यक्ती मानसिकरित्या अस्वस्थ आणि तणावग्रस्त राहते. सतत पाय हलवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो, ज्यामुळे समृद्धी कमी होते आणि आर्थिक समस्या वाढतात. ही सवय टाळणे आणि बसताना पाय स्थिर ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.

भेगा पडलेले पाय

पायांची स्वच्छता आणि काळजी न घेतल्याने राहू आणि मंगळाचा अशुभ प्रभाव वाढतो. राहू हा अशुद्धता आणि अव्यवस्था यांचे प्रतीक आहे, तर मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि क्रोधाशी संबंधित आहे. जर पायांची काळजी घेतली नाही किंवा टाचांना भेगा पडल्या असतील, तर याचा वैवाहिक जीवनावर कौटुंबिक नातेसंबंधांवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होतो.

Guruwar Upay: गुरुवारी संध्याकाळी करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

कशा असाव्यात पायांच्या सवयी

तुमचे पाय व्यवस्थित ठेवायला शिका.

पाय घासत चालण्याची सवय सोडून द्या.

दररोज तुमचे पाय स्वच्छ करा आणि त्यांची काळजी घ्या. भेगा पडलेल्या टाचांवर नियमितपणे उपचार करा.

योग्य आकाराचे आणि आरामदायी शूज घाला.

पायांची मालिश आणि हलका व्यायाम करून ऊर्जा आणि संतुलन राखा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वारंवार पाय हलवण्याची सवय का होते?

    Ans: ही सवय बहुधा तणाव, बेचैनी, चिंता किंवा ऊर्जा जास्त असणे यामुळे निर्माण होते. कधी कधी हे व्यक्तीच्या स्वभावाचेही लक्षण असू शकते.

  • Que: ज्योतिषानुसार पाय हलवण्यामागे कोणता ग्रह कारणीभूत असू शकतो?

    Ans: अस्थिरता, चंचलता किंवा बेचैनी वाढल्यास चंद्र, मंगळ किंवा बुध ग्रह असंतुलित असल्याचे संकेत मिळतात.

  • Que: पाय हलवण्याची सवय आरोग्यास हानीकारक आहे का?

    Ans: दीर्घकाळ ही सवय राहिल्यास मानसिक ताण, एकाग्रतेचा अभाव, थकवा, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता वाढू शकते.

Web Title: Astro tips do you have the habit of moving your legs frequently health effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
1

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
2

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

Weekly Horoscope 2026: मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
3

Weekly Horoscope 2026: मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता
4

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.