फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंधित आहे. सोमवारी लोखंड खरेदी करणे अशुभ मानले जाते. कारण सोमवारचा दिवस हा चंद्र ग्रहाला समर्पित आहे. चंद्र ग्रहाला मन, शांती, शीतलता आणि भावनांचा कारक मानले जाते. चंद्र आणि शनि यांचा प्रतिकून संबंध असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. जर तुम्ही सोमवारी लोखंड खरेदी केल्यास त्याचा शनि आणि चंद्रावर नकारात्मक परिणाम पडू शकतो. या नकारात्मक परिणामामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सोमवारी लोखंडी वस्तू खरेदी केल्यास काय होते, जाणून घ्या
चंद्र ग्रहाला मनाचा कारक मानले जात असल्याने लोखंडी वस्तू सोमवारी खरेदी केल्याने मानसिक अशांतता, ताण, चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते. यामुळे तुमच्यात असलेली मानसिक शांतता भंग होऊ शकते.
मान्यतेनुसार, सोमवारी लोखंडी वस्तू खरेदी केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा अनावश्यक खर्चामध्ये वाढ होऊ शकते. या सर्वांचा तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
चंद्र ग्रह हा भावना आणि नातेसंबंधांचा देखील एक घटक आहे. त्यामुळे सोमवारी लोखंडी वस्तू खरेदी केल्यास परिवारामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये नकारात्मकता वाढू शकते. नातेसंबंधामध्ये येणारा तणाव, कलह आणि कटुता वाढू शकते.
शनि हा अडथळे आणि विलंबांचा ग्रह असल्याने या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्यास तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, तुमच्या योजनांना विलंब होऊ शकतो किंवा तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकत नाही.
असे म्हटले जाते की, सोमवारी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने हाडे, सांधे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित समस्या यांसारख्या अनेक आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे सोमवारी लोखंड खरेदी केल्याने घरातमध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते यामुळे तुमच्या नात्यामधील कलह आणि अशांतता वाढते.
जर तुम्हाला लोखंडी वस्तू खरेदी करायची असल्यास शनिवारचा दिवस शुभ मानला जातो. शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असल्याने या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने शनि देव प्रसन्न होतात. यामुळे तुमच्या कुंडलीत शनिचा असलेला अशुभ प्रभाव कमी होतो आणि संपत्तीमध्ये वाढ होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)