फोटो सौजन्य- pinterest
रविवारचा दिवस सूर्याला समर्पित आहे. यावेळी सर्व राशीच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. तसेच चंद्र सिंह राशीत संक्रमण करेल. त्यामुळे लक्ष्मी योग आणि मालव्य राजयोग देखील तयार होत आहे. त्यासोबतच माघ नक्षत्र ही आहे. रविवारचा दिवस लक्ष्मी योग आणि सूर्य देवाच्या कृपेमुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. जाणून घ्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस चांगला राहणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. तुमची अनोळखी लोकांची ओळख होऊ शकते त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा ताण कमी होईल. तुम्ही मनोरंजनासाठी पैसे खर्च करु शकता. तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊन दान देखील करु शकता.
Vastu Tips: घरातील सदस्य वारंवार आजारी पडत आहे करुन पाहा हे वास्तू उपाय
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. विद्यार्थी करिअर किंवा शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड नफा देखील मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने तुमचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तसेच या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही घरामध्ये एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. मित्रांच्या मदतीने तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. जर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)