
फोटो सौजन्य- pinterest
गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हा दिवस गुरु ग्रहाशी देखील संबंधित आहे. गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाची पूजा केल्याने विशेष फायदे होतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजा करण्यासोबतच, प्रदोष काळात संध्याकाळी काही खास ठिकाणी दिवे लावण्याचेही महत्त्व आहे. असे केल्याने घरातील नकारात्मता दूर होते आणि घरातील सदस्यांवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. याव्यतिरिक्त, त्या व्यक्तीची आर्थिक समस्यापासून देखील सुटका होते. गुरुवारी कोणत्या ठिकाणी दिवे लावावेत ते जाणून घ्या
प्रदोष काळात पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगदी आधीपासून ते सूर्यास्तानंतरपर्यंतचा काळ म्हणजे प्रदोष काळ, जो सुमारे दीड तासांचा असतो. या काळात पूजा करणे आणि दिवा लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. गुरुवारी पूजा करताना देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर दिवा लावावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आर्थिक समस्यातून सुटका होते.
संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी पूजा आणि आरती केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. असे मानले जाते की संध्याकाळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर तिचा विशेष आशीर्वाद राहतो. गुरुवारी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यामुळे घरातील वातावरण आनंददायी राहते.
तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते. श्रद्धेनुसार, प्रदोष काळात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. दर गुरुवार आणि शुक्रवारी असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू येतात. तसेच घरामधील समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असल्यास हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरतो. तुळशीजवळ नियमितपणे दिवा लावल्याने व्यक्तीची आर्थिक समस्येतून सुटका होते आणि घरामधील आर्थिक स्थिती सुधारते.
वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात आग्नेय दिशेचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. ते सुख, समृद्धी, सकारात्मकता, ज्ञान आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. गुरुवारी या दिशेने दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते. तुम्हाला घरगुती समस्या देखील दूर होतात. प्रदोष काळात दर गुरुवारी हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहील आणि ज्ञानात वाढ होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरुवारी संध्याकाळी विष्णू लक्ष्मीच्या समोर आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवे लावावेत
Ans: संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावावा
Ans: सतत पैशाची कमतरता, नोकरीतील अडथळे, व्यवसायामधील नुकसान,