Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: चंद्र धन आणि संपत्ती वाढवतो, सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जाणून घ्या

कुंडलीमध्ये चंद्र दुसऱ्या घरात असल्यास त्याचा परिणाम खोलवर होताना दिसून येतो. ज्यावेळी तो बलवान असतो त्यावेळी यश आणि संतुलन मिळते. जेव्हा तो कमकुवत असतो तेव्हा चिंता आणि संघर्ष निर्माण करतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 26, 2025 | 10:02 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रात, चंद्राची स्थिती आपल्या मनावर, भावनांवर आणि जीवनाच्या मानसिक स्थितीवर खोलवर प्रभाव पाडते. ज्यावेळी चंद्र दुसऱ्या घरामध्ये असतो त्यावेळी त्याचा परिणाम आपल्या संपत्ती, कुटुंब, बोलण्याच्या सवयी आणि खाण्यापिण्याच्या इच्छांवर होताना दिसून येतो. तर दुसरे घर हे संपत्तीचे घर मानले जाते आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात स्थिरता आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. या चंद्र स्थानाशी संबंधित फायदे आणि तोटे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक पाहिल्यास चंद्र चांगल्या स्थितीत असल्यास एखादी व्यक्ती भावनिक असूनही, त्यांच्या मालमत्तेमध्ये आणि कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन राखू शकते. यामुळे त्याला गोड बोलण्याची आणि लोकांशी संपर्क साधण्याची क्षमता मिळते. ज्यावेळी तो नकारात्मक स्थितीमध्ये असतो त्यावेळी चंद्र लोभ, चिंता आणि मानसिक अस्थिरता निर्माण करू शकतो. त्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वासाचा अभाव आणि कौटुंबिक बाबीमधील संघर्ष तयार होतो.

ज्यावेळी चंद्र व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरात असतो त्यावेळी तो व्यक्तीच्या जीवनामधील अनेक बदल घडवून आणतात. तसेच सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय होतात आणि कोणत्या उपायांनी हे दोष कमी करता येतात. त्यामुळे जीवनात संतुलन आणि मानसिक शांती आणण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या

दुसऱ्या घरात चंद्राचे होणारे सकारात्मक परिणाम

संपत्ती आणि मालमत्तेत वाढ

ज्यावेळी चंद्र दुसऱ्या घरामध्ये चांगल्या स्थितीत असतो त्यावेळी व्यक्तीचे उत्पन्न आणि संपत्ती वाढते. ते त्यांच्या कमाईचा वापर हुशारीने करतात आणि आर्थिक स्थिरता राखतात.

Chhath Puja 2025: छठ पूजेची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या या सणांमागील इतिहास

गोड बोलणे आणि सामाजिक संवाद

दुसऱ्या घरात चंद्र असल्याने व्यक्तीची बोलण्याची शैली गोड होते. लोकांना त्यांच्याशी जोडले जाणे आवडते आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होतात. त्यासोबतच व्यक्तीची बोलण्याची शैली गोड होते. लोकांना त्यांच्याशी जोडले जाणे आवडते आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होतात.

अन्न आणि पेयांमध्ये संतुलन आणि चव

दुसऱ्या घरामध्ये चंद्र व्यक्तीला अन्न आणि पेय यांबाबत विवेकी बनवतो. त्यामुळे चव आणि पोषणाकडे लक्ष देण्याची सवय लागते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य देखील सुधारते.

चंद्राचा नकारात्मक प्रभाव

आर्थिक चिंता आणि मानसिक ताण

जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत किंवा दोषपूर्ण असेल तर व्यक्तीला सतत पैशाची चिंता असते. त्यांना आर्थिकदृष्ट्या असुरक्षित वाटू शकते आणि अनावश्यक खर्चात गुंतू शकते.

भावनात्मक अस्थिरता

ज्यावेळी दुसऱ्या घरामध्ये कमकुवत चंद्र एखाद्या व्यक्तीला जास्त भावनिक आणि संवेदनशील बनवू शकतो. त्यावेळी तो छोट्या छोट्या गोष्टींवरून सहजपणे अस्वस्थ किंवा रागावू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Zodiac Sign: चंद्राधी योग आणि सूर्य देवाच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल सन्मान

अत्यधिक लोभ आणि संघर्ष

चंद्राच्या या परिस्थितीमुळे लोभ आणि कठोर भाषण होऊ शकते. व्यक्ती कौटुंबिक आणि व्यावसायिक वादात अडकू शकते आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते.

सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांसाठी हे करा उपाय

पैसे आणि सोन्याचे रक्षण करणे

ज्यावेळी चंद्र दुसऱ्या घरात कमकुवत स्थितीमध्ये असेल त्यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीची काळजी घ्या. अनावश्यक खर्च कमी करा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा.

पाणी आणि दुधाचे दान

आठवड्यातून एकदा गरीब किंवा गरजू व्यक्तीला दूध, पाणी किंवा अन्न दान केल्याने चंद्राची नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक शांती मिळते.

सकारात्मक विचार आणि ध्यान

दररोज १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम केल्याने मानसिक संतुलन आणि भावनिक स्थिरता येते. या सरावामुळे मन शांत होते आणि चिंता कमी होते.

चांदीचे दागिने किंवा चांदीची प्लेट

घरात चांदीची भांडी किंवा दागिने ठेवल्याने चंद्राची सकारात्मक ऊर्जा वाढते. पूजेमध्ये चांदीचा वापर करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips moon in second house meaning positive and negative effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Vakri: बुद्धी आणि व्यवसायाचा कर्ता बुध 2026 मध्ये होणार वक्री, या राशीच्या लोकांना मिळेल यश
1

Budh Vakri: बुद्धी आणि व्यवसायाचा कर्ता बुध 2026 मध्ये होणार वक्री, या राशीच्या लोकांना मिळेल यश

Budh Gochar December 2025: वृश्चिक राशीत बुध गोचर, 23 दिवस 12 राशींवर होणार परिणाम, पैशाची हानी; उलगडणार रहस्य
2

Budh Gochar December 2025: वृश्चिक राशीत बुध गोचर, 23 दिवस 12 राशींवर होणार परिणाम, पैशाची हानी; उलगडणार रहस्य

Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुभ काळाची सुरुवात, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि नशिबाची साथ
3

Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुभ काळाची सुरुवात, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि नशिबाची साथ

Astro Tips : देवघरातल्या नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय ?
4

Astro Tips : देवघरातल्या नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.