फोटो सौजन्य- pinterest
जीवनामध्ये प्रत्येकालाच पैसा, शांती आणि समृद्धी या तीन गोष्टी हव्या असतात. काही जण ऑफिसमध्ये रात्रंदिवस कठोर मेहनत घेतात, तर काही जण व्यवसायात जोखीम घेतात. त्याचसोबत मंदिरात पूजा करतात, पण काही सोपे आणि घरगुती उपाय ते केल्याने समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. यापैकीच एक उपाय म्हणजे शिवलिंगावर डाळिंबाचा रस अर्पण करणे. असे म्हटले जाते की, यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधाण्यास मदत होते. जाणून घेऊया शिवलिंगावर डाळिंबाचा रस का अर्पण केला जातो.
आयुर्वेदमध्ये डाळिंब्याला शुभ आणि शक्तिशाली फळ मानले जाते. त्याला रक्त उत्तेजक म्हटले जाते आणि ते शरीराला ऊर्जा देते. त्याचप्रमाणे शिवलिंगावर अर्पण केलेले प्रत्येक फळ हे द्रव आपल्या मनाचे आणि भावनांचे अर्पण असते. असे म्हटले जाते की, डाळिंबाचा रस अर्पण करणे म्हणजे डाळिंबाच्या आत असलेली शक्ती महादेवांना अर्पण करणे.
हा उपाय तुम्हाला करायचा असल्यास सोमवार किंवा महाशिवरात्रीसारख्या दिवशी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरतो. यासाठी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करुन तुमच्या घरातील देव्हाऱ्यात किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर डाळिंबाचा रस अर्पण करा. फक्त त्याचे प्रमाण जास्त नसावे. डाळिंबाचा रस अर्पण करताना दोन ते चार थेंब पुरेसे आहेत. त्यानंतर महादेवांचे ध्यान करताना मनात स्पष्ट हेतू ठेवा.
हा उपाय केल्याने तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो. हा उपाय केवळ अंधश्रद्धा नाही आहे तर श्रद्धा आहे. श्रद्धाच माणसाचे विचार बदलते आणि जर विचार बदलला तर परिस्थिती देखील बदलते.
ज्या लोकांचे पैसे बऱ्याच काळापासून अडकले आहेत किंवा अधुनमधून येत आहेत, अशा लोकांनी हा उपाय करावा.
ज्या लोकांना व्यवसायामध्ये सतत नुकसान होत आहे, अशा लोकांनी हा उपाय करावा
ज्या लोकांना नोकरीमध्ये बढती किंवा पगारामध्ये काही समस्या येत आहे त्यांनी हा उपाय करावा
जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर त्या लोकांनी हा उपाय करावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहील.
नेहमी डाळिंबाचा रस ताजा असावा.
डाळिंबाचा रस अर्पण करुन झाल्यानंतर उरलेला रस कोणालाही देऊ नका.
मनामध्ये कोणताही लोभ नसावा
लगेच चमत्काराची अपेक्षा करू नका, विश्वास आणि संयम ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)