फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 4 ऑगस्ट, आज 4 अंकांचा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर आज राहूचा प्रभाव राहील. आजचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना ग्रूपमधील सहकार्याचे सहकार्य मिळेल. तर मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यस्त राहील. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या राहतील. जास्त धावपळ केल्याने मानसिक ताण येऊ शकतो. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. समस्यांना तोंड द्यावे लागेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. मानसिक तणाव येऊ शकतो. कामानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका अन्यथा नुकसान होईल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही योजावेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला प्रदेशातून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही घरगुती कामामध्ये व्यस्त राहू शकता. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही व्यस्त राहाल. तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. कुटुंबासोबत वेळ चांगला घालवाल. अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण होतील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वडिलांचा पाठिंबा मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकतात. आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)