फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मशास्त्रामध्ये शरीराची रचना, आकार आणि खुणा या नशिबाची जोडल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे. ज्याला समुद्रशास्त्र असे म्हटले जाते. यामध्ये उल्लेख केल्यानुसार व्यक्तीच्या शरीरावर या ठिकाणी तीळ असणे म्हणजे त्याचा स्वभाव, सौभाग्य आणि भविष्याचे ते भाकीत असल्याचे मानले जाते.
शरीरावरील असलेले तीळ स्थान, आकार आणि रंग व्यक्तीच्या जीवनात कोणती भूमिका बजावणार आहे हे दर्शवते. समुद्रशास्त्रानुसार या 5 ठिकाणी तीळ असणे भाग्याचे मानले जाते. अशा लोकांना सुख संपत्ती मिळते, असे म्हटले जाते. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणे फायदेशीर आहे, जाणून घ्या
समुद्रशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या उजव्या तळहातावर, खासकरुन अंगठ्याच्या खाली किंवा मधल्या भागात तीळ असते याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीला जीवनामध्ये संपत्ती, समृद्धी आणि यश मिळणार आहे. तसेच हे लोक आपल्या कर्माच्या जोरावर जोरावर उच्च पदांपर्यंत पोहोचतात. त्यासोबतच या लोकांना नशिबाची साथ देखील मिळते.
एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या तळव्यावर तीळ असणे खूप शुभ मानले जाते. समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पायाच्या तळव्यावर तीळ असते ती व्यक्ती खूप भाग्यवान समजली जाते. असे लोक आपल्या जीवनामध्ये खूप प्रवास करतात तसेच अशा लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते.
ज्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतात त्या व्यक्तीमध्ये नेतृत्वगुणांचा भरणा असतो. अशा लोकांना समाजामध्ये आदर मिळतो. त्यासोबतच राजकारण, प्रशासन किंवा नेतृत्व क्षेत्रात देखील हे लोक यशस्वी होतात. त्याचप्रमाणे जीवनात देखील कीर्ती मिळवितात.
मानेच्या पुढच्या भागात तीळ असणे खूप शुभ मानले जाते. त्या व्यक्तीला कधीही अन्न, कपडे आणि पैशाची कमतरता भासत नाही. अशा लोकांचा स्वभाव सौम्य असतात आणि या लोकांना जीवनामध्ये मित्र आणि नातेवाईकांचा पाठिंबा मिळतो. मानेवर तीळ असणारे लोक गोड बोलणारे आणि ते सर्वांनाच आवडतात.
नाभीजवळ तीळ असणे शुभ मानले जाते. अशा लोकांना बालसुख, आर्थिक समृद्धी आणि भौतिक सुख मिळते असे म्हटले जाते. अशा लोकांच्या जीवनामध्ये कौटुंबिक संतुलन राहते. तसेच या लोकांच्या जीवनात संघर्ष असले तरी हे लोक प्रत्येक परिस्थितीत विजयी होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)