फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यदेवाला कुंडलीमध्ये विशेष स्थान आहे. नऊ ग्रहांपैकी एक महत्त्वाचा भाग असणारा सूर्यदेवामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. तसेच या लोकांना समाजात आदर वाढण्याची शक्यता आहे. ज्यावेळी कुंडलीमध्ये सूर्य ग्रहाची स्थिती बदलतो त्यावेळी अनेक राशीच्या लोकांना त्याचा फायदा होतो.
आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी 4.16 वाजता सूर्यदेवाने कर्क राशीत असताना आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यामुळे मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. सूर्य संक्रमणाचा प्रभाव या तिन्ही राशींच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या, पहिल्या आणि नवव्या घरावर होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होईल. मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नक्षत्र संक्रमणाचा कसा फायदा होईल, जाणून घ्या
सूर्याचे संक्रमण मिथुन राशीचे संक्रमण कुंडलीमध्ये तिसऱ्या घरामध्ये होत आहे. तो धन, वाणी आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो. सूर्याच्या आशीर्वादाने या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. हे लोक कुटुंबासोबत आपला वेळ घालवतील. तसेच मिथुन राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. जर तुम्ही कोणाकडूनही कर्ज घेतले असल्यास ते तुम्ही वेळेवर फेडू शकता.
मिथुन राशीसोबतच कर्क राशीच्या लोकांना देखील सूर्याचे संक्रमण शुभ ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांना या संक्रमणाचा प्रभाव त्यांच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरात होणार आहे. सूर्य हा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि शारीरिक स्वरूपाशी संबंधित असल्याचे मानले जाते. सूर्याच्या कृपेने तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याची शक्यता आहे. जर तुमचे कोणाशी वाद असल्यास ते संपतील. तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, त्यांच्यासोबत वेळ घालवाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणताही जुना आजार असल्यास तो दूर होऊ शकतो.
मिथुन आणि कर्क राशीसोबतच वृश्चिक राशीच्या लोकांना देखील सूर्याचे संक्रमण शुभ ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना हे संक्रमण त्यांच्या कुंडलीमध्ये नवव्या घरात परिणाम करणारे आहे. ज्याचा संबंध भाग्य, आध्यात्मिक विकास, वडील आणि लांब प्रवासाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या काळामध्ये तुम्ही बाहेर प्रवास करु शकता. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)