फोटो सौजन्य- pinterest
व्यक्तीच्या मूळ संख्येवरुन त्यांच्या भविष्याविषयी अंदाज घेता येतो. अशावेळी आपल्याला व्यक्तीच्या मूलांकांवरुन त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व देखील समजते. कोणत्या मूलांकांची लोक व्यवसायात झेप घेतात, जाणून घ्या
व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची जन्मतारीख महत्त्वाची असते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन मूलांक काढता येते. मूलांकद्वारे भविष्यात मिळणारे फायदे आणि घडणाऱ्या घटनाचा अंदाज घेता येतो. तसेच आपल्याला व्यक्तीचे गुण, भावना आणि स्वभाव याबद्दल माहिती मिळते. या सर्वांचा स्वतःचा स्वामी ग्रह असतो ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच दिसून येतो. या सर्वांपैकी आपण मूलांक 7 असलेल्या लोकांचे जीवन कसे असते, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व याबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्यातील 7, 16 आणि 25 तारखेला झाला आहे त्या लोकांची मूलांक संख्या 7 असते. त्या व्यक्तीची मूळ संख्या 7 मानली जाते.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह केतू मानला जातो. केतू ग्रहाला गूढता आणि अध्यात्माचा कारक देखील मानले जाते. मान्यतेनुसार, केतू ग्रह हा अदृश्य शक्तींशी संबंधित असल्याने आपल्याला भविष्याचा अंदाज लावता येतो. यामुळे मूलांक 7 असलेल्या लोकांबद्दल भविष्यातील घटनांचे आगाऊ भाकित करता येतात. या लोकांचे पुढील भविष्या काय असेल, काय करता येऊ शकेल हे जाणून घेता येते.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांना बुद्धिमान मानले जातात. हे लोक आपले विचार वेळ आणि परिस्थिती पाहून व्यक्त करतात. या अंकाचा स्वामी ग्रह केतू असल्यामुळे या लोकांना बोलण्यापेक्षा गोष्टींचा सखोल शोध घेण्यात अधिक रस घेतात. दरम्यान, त्यांच्या स्वभाव हा रहस्यमय असतो. मूलांक 7 असणाऱ्या लोकांच्या मनात काय चालले आहे ते जाणून घेणे थोडे कठीण मानले जाते. या लोकांना समज चांगली असल्याने येणाऱ्या समस्या आणि संकटांची यांना आधीच जाणीव होते. मूलांक 7 चे लोक ध्यान, योग किंवा गूढ गोष्टींमध्ये आपला सहभाग अधिक दाखवतात.
मूलांक 7 असलेले लोक करिअर आणि शिक्षण क्षेत्रासंदर्भात गंभीर असतात. हे लोक व्यवसायामध्ये आपला प्रामाणिकपणा दाखवून काम करतात त्यामुळे समाजात त्यांची चांगली प्रतिमा तयार होते. हे लोक स्वतःला इतरांसोबत राहण्यासाठी प्रोत्साहित करतात. मूलांक 7 असलेल्या लोकांना गर्दीपासून लांब राहण्यास आवडते. तसेच हे लोक शांती मिळावी म्हणून एकांतात वेळ घालवणे पसंत करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)