फोटो सौजन्य- pinterest
शनिवार, 21 जूनचा दिवस विशेष आहे. कारण या दिवशी योगिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. हा दिवस सर्वांत मोठा दिवस मानला जातो. यावेळी 19 वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. असा योग 2006 मध्ये घडून गेला आहे. या योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. तसेच योगिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बुध ग्रह आपली राशी बदलत असल्याने काही राशीच्या लोकांना वाईट काळ सुरु होणार आहे म्हणजेच या लोकांना अनेक समस्या आणि अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
शनिवारी सूर्य सकाळी लवकर उगवणार आणि उशिरा मावळणार आहे त्यामुळे हा दिवस सुमारे 14 तास चालण्याची शक्यता आहे. ही घटना खगोलीयच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची मानली जाते. 19 वर्षानंतर सर्वांत मोठा दिवस एकाच दिवशी येत असल्याने हा दिवस सर्वोत्कृष्ठ मानला जातो.
योगिनी एकादशीचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणारा आहे. यावेळी परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक खास भेट देखील मिळू शकते. तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. व्यवसायामध्ये असलेले लोक नवीन करार करु शकतात. वर्डिलोपार्जित मालमत्ता असलेल्यांना विशेष लाभ होऊ शकतो.
तूळ राशीच्या लोकांचा एकादशीचा दिवस उत्साहाचा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतीची शक्यता. या लोकांना परदेशात काम करण्याची संधी देखील मिळू शकते. तुम्ही ज्या व्यवसायात गुंतवणूक केली असाल त्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. या लोकांचे आरोग्य उत्तम राहील.
धनु राशीच्या लोकांना योगिनी एकादशीचा दिवस चांगला असणार आहे. धनु राशीचे लोक प्रत्येक आव्हांनाना तोंड देऊ शकतात. तुम्ही कोणत्या कामात मेहनत घेत असाल त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील.
योगिनी एकादशीचा दिवस कुंभ राशीच्या लोकांना फायदेशीर असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन कामगिरी करुन उच्च पदापर्यंत पोहोचून शकता. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढलेली असेल. एखादा दीर्घकाळापासून असलेला आजार बरा होईल.
मीन राशीच्या लोकांना योगिनी एकादशीचा दिवस उत्साहाचा राहील. हे लोक अध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तुमच्या मनातील मानसिक गोंधळ संपेल. तुमचा अध्यात्मामध्ये रस वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)