फोटो सौजन्य- pinterest
जुलै आणि ऑगस्ट महिना अनेक राशींच्या लोकांसाठी खास राहणार आहे. कारण या महिन्यामध्ये बुध ग्रहाचे संक्रमण केल्यानंतर त्याच राशीमध्ये ते वक्री होणार आहेत. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संभाषण, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रह एकाच राशीमध्ये राहून त्याचा थेट परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होफतो तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या विचारसरणी उत्पन्न आणि यशावर होतो.
यंदा बुध ग्रह रविवार, 22 जून रोजी रात्री 9 वाजून 33 मिनिटांनी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तो 30 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहणार आहे. यावेळी बुध 18 जुलै रोजी वक्री होईल आणि 11 ऑगस्ट रोजी पुन्हा थेट होईल. बुधाचा हा प्रभाव काही राशीच्या लोकांवर 70 दिवस राहील. मिथुन, कन्या, तूळ, धनु आणि कुंभ या राशींना बुध संक्रमणाच्या काळात फायदा होऊ शकतो.
बुधाच्या संक्रमणाचा दिवस या राशीच्या लोकांना खूप शुभ राहणार आहे. तुमच्या परिवारातील वातावरण चांगले राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. मिथुन राशीची लोक कपडे, दागिने यांसारख्या वस्तूंची खरेदी करु शकतात. व्यवसायामुळे तुम्हाला अनेक नव्या संधी मिळू शकतात.
बुधाच्या संक्रमणाचा कन्या राशीच्या लोकांवर अनुकूल परिणाम होऊ शकतो. या ग्रहाला उत्पन्नाशी संबंधित मानला जातो. कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये अनेक फायदे होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी हे लोक इतरांपेक्षा चांगली कामगिरी दाखवू शकतात. तुमच्या शब्दांचा प्रभाव इतरांवर पडू शकेल. मालमत्तेच्या संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल.
तूळ राशीमध्ये बुधाचे संक्रमण करिअरशी संबंधित आहे. या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशात काम करत आहे त्यांना अनेक फायदे होतील. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आरोग्य चांगले राहील.
बुधाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांमध्ये संशोधन कार्याशी संबंधित आहे. हे लोक ज्या क्षेत्रात कठोर मेहनत घेत असाल त्यांना चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल. समाजामध्ये तुमचा आदर वाढलेला राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फायदेशीर राहील. जर एखादी व्यक्ती जुन्या आजाराने ग्रस्त असेल त्या लोकांना आराम मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. लेखन, माध्यम किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. तुमच्या मेहनतीचे आता फळ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)