फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामधील आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो, जो जीवनाचा पाया आणि उर्जेचा स्रोत मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मा, आदर, पद, प्रतिष्ठा आणि यशासाठी जबाबदार ग्रह मानला जातो.
रविवारी केलेले उपाय सूर्यदेवाला प्रसन्न करतात. ज्यामुळे जीवनात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि आदर मिळतो. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे आणि उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. रविवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या
रविवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये लाल फुले, तांदूळ आणि थोडा गूळ घाला आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा. सूर्याला पाणी अर्पण करताना ओम घृण्य सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा.
रविवारी लाल रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. कारण हा रंग सूर्यदेवतेचा आवडता रंग मानला जातो. तसेच यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवते.
असे म्हटले जाते की, रविवारी गूळ, गहू आणि लाल रंगांचे वस्त्र दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.
रविवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यातून अन्न किंवा पाणी सेवन केल्याने तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. असे केल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
रविवारच्या दिवशी गरजू आणि गरिबांना जेवण आणि मिठाई दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनातील समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते.
रविवारच्या दिवशी तुम्ही घरातील देव्हाऱ्यात सूर्यदेव किंवा भगवान विष्णूची पूजा करुन लाल फुले अर्पण करु शकतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कौटुंबिक कलह दूर होतात.
रविवारच्या दिवशी उपवास करुन फक्त एकच वेळा जेवल्याने सूर्यदोष शांत होतो. उपवासाच्या दिवशी मीठ खाणे टाळा तर या दिवशी फळे खा.
रविवारी तेल, मीठ किंवा मांस खाणे टाळा.
या दिवशी केस आणि नखे कापणे टाळा.
खोटे बोलणे, इतरांना फसवणे आणि रागावणे टाळा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)