फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुुसार, ग्रह आणि नक्षत्रांनुसार अनेक जण सोन्याची अंगठी कोणत्या बोटात परिधान करावी याला प्राधान्य देतात. सोन्याचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी दागिने म्हणून केला जातो. मात्र याचा संबंध समृद्धी, शुभ आणि सकारात्मक उर्जेशी संबंधित मानला जातो. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, जर शरीराच्या कोणत्याही भागावर योग्य पद्धतीने परिधान केल्याससौंदर्य वाढवतेच त्यासोबतच व्यक्तीच्या जीवनामध्ये यश, आरोग्य आणि आनंद देखील येतो. असे मानले जाते की, सोने योग्य रित्या परिधान केल्यास नशिबाची साथ मिळते आणि त्रास देखील कमी होतो. सोने परिधान करण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या
हिंदू धर्मात सोन्याला खूप शुभ मानले जाते. यालाच एकेकाळी सोन्याचा पक्षी म्हणून देखील ओळखले जायचे. बऱ्याचदा आपण शुभ प्रसंगी, लग्नामध्ये किंवा सणसमारंभामध्ये सोने परिधान करतो. सोन्याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्याचा लोकांच्या जीवनावरही प्रभाव पडतो. असे म्हटले जाते की, सोने परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात शक्ती आणि धैर्य येते. सोने परिधान केल्याने मानवी शरीरावर आणि मनावर थेट परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीमधील ऊर्जा शक्ती वाढते.
गळ्यात सोन्याची चेन घातल्याने वैवाहिक जीवनात संतुलन आणि सुसंवाद येतो, अशी मान्यता आहे. त्यासोबतच पती-पत्नीमधील नात्यात समज आणि सहकार्य वाढते. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांनी गळ्यामध्ये सोन्याची चेन परिधान करणे खूप फायदेशीर मानले जाते.
अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालण्याचा संबंध कौटुंबिक कल्याण आणि बाळंतपणाशी संबंधित आहे. हा उपाय विशेषतः मुले हवी असलेल्या जोडप्यांसाठी शुभ मानला जातो.
ज्या लोकांना हृदयरोगाचा त्रास आहे अशा लोकांनी सोन्याचा मुलामा असलेला किंवा सोन्याने रुद्राक्ष घातलेला रुद्राक्ष धारण करणे उपयुक्त मानले जाते. हृदयाच्या कमकुवतपणा आणि संबंधित आजारांवर हा एक सोपा उपाय मानला जातो.
ज्या लोकांना करिअरमध्ये प्रगती करायची आहे त्यांनी तर्जनी बोटामध्ये सोने परिधान करावे. या बोटांचा संबंध महत्वाकांक्षा आणि निर्णायकतेशी असतो. नवीन नोकरी, पदोन्नती किंवा व्यावसायिक वाढीची इच्छा असलेल्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरु शकतो.
जे लोक करंगळीमध्ये अंगठी परिधान करतात त्या लोकांना मानसिक शांती आणि आरोग्यासाठी असे करणे फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्यांपासून आराम मिळतो. तणावग्रस्त लोकांना या बोटात सोने परिधान केल्याने फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)