फोटो सौजन्य- pinterest
आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. त्यापैकी रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. रविवारी सकाळी सर्व आवरुन झाल्यावर विधिवत सूर्य देवाची पूजा करुन सूर्य देवाला जल अर्पण केल्याने त्याचा आपल्याला लाभ होतो. जे भक्त सूर्यदेवाचे हे उपाय करतात त्यांच्यावर सूर्यदेवाचा कायम आशीर्वाद राहतो. ज्योतिषशास्त्रामध्ये रविवारच्या उपायांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास रविवारी कोणते उपाय करावे ते सांगण्यात आले आहे. जाणून घ्या रविवारचे उपाय
जर तुमच्या घरामधील आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रविवारी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर विधीवत सूर्यदेवाची पूजा करावी. त्यानंतर एखादे तांब्याचे भांडे घेऊन त्यामध्ये पाणी, लाल रंगांची फुले, तांदूळ आणि गूळ ठेवावा. या सर्व गोष्टी सूर्यदेवाला दाखवाव्यात. त्यानंतर ॐ आदित्य नम: या मंत्रांचा शक्यतो 108 वेळा जप करावा. हे उपाय दर रविवारी सकाळी केल्याने घरातील आर्थिक समस्येतून सुटण्यास मदत होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण करण्याबरोबरच माशांना पिठाचे गोळे खायला देणे देखील फायदेशीर ठरते, असे मानले जाते. तसेच या दिवशी संध्याकाळी तलाव किंवा नदीजवळ जाऊन माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे. असे केल्याने भरपूर पूण्य मिळते, अशी मान्यता आहे. रविवारच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला दिल्याने व्यक्तीच्यी जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आर्थिक लाभ देखील होण्यास सुरुवात होते.
रविवारी सकाळी आवरुन झाल्यानंतर नारंगी, गुलाबी, सोनेरी किंवा लाल रंगांचे कपडे परिधान करावे. त्यानंतर ‘ॐ घृणी सूर्याय नम:’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. या उपायामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील असलेले सूर्याचे स्थान मजबूत होते आणि व्यक्तीचा समाजात आदर वाढतो. मान्यतेनुसार, व्यक्तीने भक्तीभावाने हा उपाय केल्यास त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. रविवारी गरजूंना मीठ दान करणे फायदेशीर ठरते. या उपायामुळे जीवनातील येणाऱ्या समस्येपासून मुक्तता होते. त्याशिवाय तुम्ही जवळच्या एका मंदिरात जाऊन गूळ आणि गहूचे दान करावे. हा उपाय केल्याने जीवनात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. गरजूंना दान करताना चुकूनही मिठाचे दान करु नये असे केल्यास अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
जर तुम्हाला जीवनात खूप समस्या येत असतील तर वडाचे पान घ्या त्यावर संध्याकाळी तुमची इच्छा लिहा. त्यानंतर ते पान तुमच्या उशीजवळ ठेवा आणि रविवारी सकाळी ते पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता होते. तसेच कामामध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात. वडाच्या पानाचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)