Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: कासवाची अंगठी तुमच्या राशीनुसार कोणत्या बोटात घालावी? जाणून घ्या नियम

वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कासवाची अंगठी बोटात घालणे शुभ मानले जाते. मात्र ती परिधान करताना योग्य काळजी घेणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. कोणते आहेत ते नियम जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 20, 2025 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बरेच जण आर्थिक समृद्धीसाठी हाताच्या बोटामध्ये कासवाची अंगठी घालतात. कासवाच्या अंगठीचा ती घालणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालण्याचे काही खास नियम आहेत जर या नियमांचे पालन न करता ही अंगठी परिधान केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. बरेच जण रस्त्याच्या कडेला किंवा छोट्या दुकानांमधून कासवाच्या अंगठी खरेदी करतात आणि ती घालतात. पण कासवाची अंगठी कोणत्या धातूची असावी हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कासवाची अंगठी घालण्याचे नियम जाणून घ्या

कासवाची अंगठी घालण्याचे नियम

ज्योतिषशास्त्रामध्ये कासवाला खूप भाग्यशाली समजले जाते. त्याला सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्यचे प्रतीक मानले जाते. कासवाच्या अंगठीचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे म्हटले जाते. जर ही अंगठी परिधान करताना योग्य नियम पाळले तर तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न राहते असे म्हटले जाते. या अंगठीला वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जाते.

August Grah Gochar: ऑगस्टमध्ये ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

असे म्हटले जाते की, कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते आणि सर्व येणारे अडथळे दूर होतात. कासवाला शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ही अंगठी परिधान करणाऱ्या व्यक्तीला अधिक संयम राहील आणि जीवनात शांती राहील. जी व्यक्ती ही अंगठी परिधान करते त्या व्यक्तीला कधीही पैशाची समस्या जाणवत नाही. नोकरी आणि व्यवसायातही यश मिळेल. त्याच्या सर्व समस्या दूर होतात.

कासवाच्या अंगठीचे तोंड या दिशेला ठेवा

ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घातल्यावर त्याचा चेहरा नेहमी तुमच्याकडे असावा. तरच संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जीवनात सुख आणि समृद्धी येईल. जर चेहरा बाहेरच्या दिशेने असेल तर संपत्ती पाण्यासारखी वाहते. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे चांदीच्या कासवाच्या अंगठीला मान्यता आहे, कारण ती चंद्र, बुध आणि लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते.

Zodiac Sign: सूर्यदेवाच्या कृपेमुळे धन योगाचा उत्तम संयोग, तुमची प्रलंबित कामे होतील पूर्ण

काढून टाकल्यानंतर परत घालताना अशी घाला

कासवाची अंगठी काढून टाकल्यानंतर ती पुन्हा घालण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहे. ही अंगठी कुठेही ठेवता येत नाही. ती काढून टाकल्यानंतर ती अंगठी देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवावी लागते. यानंतर, दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर त्या दुधाने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि नंतर ती देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि पुन्हा घाला. ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.

कोणत्या दिवशी परिधान करावी

कासवाची अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटावर परिधान करावी. ही अंगठी शुक्रवारी परिधान करणे शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मी आणि भौतिक सुखसोयींचा ग्रह शुक्र यांना समर्पित असतो. शुक्रवारी ही अंगठी परिधान केल्याने धनसंपत्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपाही कायम राहते.

या राशीच्या लोकांनी परिधान करावी

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय कासवाची अंगठी घालू नये. जर या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घातली तर ते ग्रह दोषांचे बळी ठरू शकतात त्यामुळे या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते.

परिधान करण्याचे नियम

कासवाची अंगठी शुद्ध न करता घालणे अशुभ आहे. परिधान करण्यापूर्वी गंगाजल, दूध, शुद्ध पाणी, मध, तूप इत्यादींपासून बनवलेल्या पंचामृताने अंगठी शुद्ध करा. नंतर, अगरबत्ती आणि दिवे लावल्यानंतर, लक्ष्मी मंत्र किंवा कासवाच्या बीज मंत्राने ती अभिषेक करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips rules on which finger to wear a turtle ring according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
1

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा
2

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.